नवनिर्मिती
शुभंकर करंडे - युनिटी मिडिया नेटवर्क इंडियाएखाद्या सिंहाला किंवा वाघाला उंच झेप घ्यायची असेल तर , काही वेळ प्रतीक्षा करत काही पावले मागे यावे लागते. दबा धरून बसावे लागते तसेच काहीसे आमचे देखील झाले. नव्या रंगात, नव्या ढंगात आणि वैविध्यासह प्रायोगिक तत्वावर आम्ही दिवाळी पूर्वी काही ट्रायल त्रैमासिके काढली. काही महिने नियमित ब्लॉग्स सुरु ठेवले. आणि , या सगळ्यातून आपल्याकडून जे कार्य घडते आहे याचा पाया आम्ही नीट केला. काही शक्यता तपासून पहिल्या आणि पुढील कामांच्या आणि प्रयोजनांच्या अंमलबजावणीसाठी तब्बल ३ महिने आपल्या सेवेपासून थोडेसे दूर राहिलो. परंतु, आमच्या नव्या ओळखीतून आणि आपल्या नव्या सेवाप्रणालीतून आपल्या सोबत आमचा सेवेचा बंध कायमच कार्यान्वित राहील. झाल्या विलंबाबद्दल तसेच, आपल्या सेवेस काही काळ न राहिल्याबद्दल माका आपली क्षमा मागणे अधिक योग्य वाटते.
![]() |
Official Logo of Unity Media Network India |
नव्या
सुरुवातीला नवा आयाम देण्याचा थोडासा प्रयत्न आमच्या कुटुंबाने केला आहे. नेहमीच्या
राजकीय आणि गुन्हे, अपघात विषयक माध्यम विश्वातून थोडे दूर जात काहीतरी विधायक आणि
गुणवत्तापूर्ण दर्जेदार प्रयोग करण्याची मन:पूर्वक इच्छा आहे.
अतिशय
वेगळ्या विश्वाची नवीन सुरुवात आणि नवी पायरी ओलांडताना आमच्या सारखे पामर या अथांग
अवकाशात झेपावत आहेत. त्याच्या खोलीचा अंदाज नसताना देखील यात, उडण्याचे बळ आमच्या
इवल्याश्या पंखाना आपण आशीर्वाद आणि पाठिंबा देऊनच येऊ शकते यात मला नक्कीच शंका वाटत
नाही. ही सुरुवात आहे नव्या प्रवाहाची, नव्या स्वप्नांना नवी दिशा देण्याची, आकांक्षांचे
क्षितीज न्याहाळण्याची आणि सर्वात शेवटी या देशाच्या सेवेत आजन्म कष्ट करण्याची ..
आमच्या 'युनिटी परिवारा'च्या 'सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे' या बोधवाक्यातूनच याची प्रचिती
येत असावी. आपल्या केवळ आशीर्वादांवर आम्ही खुश नाही, तर हक्काने आपण आम्हाला सल्ले
आणि अभिप्राय कळवा; चुकले तर हक्काने जरूर ओरडा आणि काही चांगले घडले तर मायेने नव्या
चांगल्या कृतीसाठी पाठ देखील थोपटा. काही विधायक प्रकल्पांना आपण साथ देखील द्या. शेवटी,
कलाकार असो वा लेखक प्रयत्नांचे प्रयोग तर कायम होत जातात पण, त्यांना गरज असते कौतुकाने
दखल घेण्याची.. आणि, आपण सारे सुज्ञ भारतीय हे काम चोख कराल याची शाश्वती वाटते.
आज
या दिवशी नवी पालवी येऊन सजलेल्या भवतालाचे नवे विश्व साकार करण्यास आम्ही येत आहोत
.
स्नेह
निरंतर टिकावा!
धन्यवाद!
जय हिंद! सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे!
शुभंकर
करंडे
हेड
मेनेजिंग डायरेक्टर
युनिटी
मिडिया नेटवर्क इंडिया
(संस्थापक
- युनिटी ग्रुप्स इंडिया)
No comments:
Post a Comment