काव्यप्रपंच
माझा या
उपक्रमासाठीचा पहिलाच ब्लॉग. म्हणून ठरवलं कि आजचा ब्लॉग हा आमच्या पिढीला किंवा
तरुणाईला समर्पित. आज आपल्या आई-वडिलांकडून किंवा आधीच्या पिढीकडून एक ओरड ऐकू
येते कि आजची तरुणाई हि कुठे तरी भरकट्ल्ये किंवा आजच्या तरुणापुढे नीट दिशा
नाहीये. पण खरं सांगायचं तर तसं नाहीये. आजच्या पिढीला मागच्या पिढीपेक्षा
व्यवसायाच्या वेगळ्या वाटा उपलब्ध आहेत, आणि त्याचबरोबर दरदिवशी अत्यंत वेगाने
बदलतं तंत्रज्ञान आणि त्याहीपेक्षा अनेकपट वेगाने बदलत असलेलं आयुष्य आजच्या
तरुणाच्या वाट्याला आलंय. आणि किंबहुना त्याचमुळे आजच्या आणि आधीच्या पिढीमध्ये एक
वाढती ‘Generation Gap ‘ निर्माण झाली आहे.
पण हे जरी कितीही खरं असलं तरी दोन्ही पिढ्या हे नक्की मान्य करतील कि आयुष्यातला
सगळ्यात सुंदर, अमूल्य आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर rocking आणि happening काळ म्हणजे तरुणपणातले दिवस. त्या
दिवसांची मजाच वेगळी असते. मित्र, कट्टा, प्रेम, राडे आणि पुन्हा तेवढ्याच
प्रेमाने एकत्र येणं म्हणजे खरं तर तरुणाई. त्या वयात एक बेधुंदपणा असतो,
जबाबदारीचं ओझं खांद्यावर नसतं आणि म्हणूनच कि काय एक वेगळीच उर्जा या वयात
आपल्यामध्ये असते.
याच उर्जेला, बेधुंदपणाला, आणि त्या अवखळ वयाला सलाम करून हा काव्यप्रपंच...
शाळा
संपल्यानंतरचं जगातलं पाहिलं पाउल,
म्हणजे तरुणाई...
कॉलेज मधला पहिला दिवस,
म्हणजे तरुणाई...
नव्या जगात वावरताना
मनातली एक अनामिक हुरहूर,
म्हणजे तरुणाई...
मित्रांचा
मनसोक्त कट्टा,
म्हणजे तरुणाई...
कट्ट्यावरचा वाफाळता कटिंग चहा,
म्हणजे तरुणाई...
मित्रांसोबत ओढलेली पहिली सिगरेट
पहिल्यांदा लपवून प्यायलेला दारूचा ग्लास,
म्हणजे तरुणाई...
कट्ट्यावर
घातलेले राडे,
म्हणजे तरुणाई...
मनसोक्त घातलेल्या शिव्या,
म्हणजे तरुणाई...
आपापसातले मतभेद,
म्हणजे तरुणाई...
जिवलग मित्रांशी झालेलं भांडण,
पुन्हा भांडण मिटवून परत एकत्र मारलेला डायलोंग,
“ तेरी मेरी यारी, मग भोकात गेली दुनियादारी”
म्हणजे तरुणाई...
नवथर वयात
दिसलेली “ती”
म्हणजे तरुणाई...
नजरेला भिडलेली पहिली नजर,
म्हणजे तरुणाई...
कधी जमलेलं, तर कधी फसलेलं प्रेम,
म्हणजे तरुणाई...
पण “ती” ने हो म्हटलं कि सगळ्या दोस्तांना,
‘ साल्या तुझी वहिनी आहे ‘ अशी करून दिलेली ओळख,
म्हणजे तरुणाई...
पालकांशी
होणारे मतभेद,
म्हणजे तरुणाई...
मांडलेली स्वतंत्र मतं,
म्हणजे तरुणाई...
नवीन technologyचा वापर,
म्हणजे तरुणाई...
Facebook, Whatsapp वर व्यस्त असलेली Generation
आणि त्यामुळे वाढती Generation Gap,
म्हणजे तरुणाई...
तरुणाई...
उत्साहाचा खळाळता झरा
आयुष्याचा खरा अर्थ
उत्कट भावनांचा मिलाप,
अल्लड, अवखळ, तरी स्वतंत्र
जगावेगळा विचार...
म्हणजे तरुणाई...
- सौरभ
सोहोनी...
साला छप्पर फाडके, क्या लिखा आपने ! मान्याच तेरेकु,अपने कुछ अंदरवाली बात आपने लिख डाली, साला ये" Generation Gap" कभी खतमच नाही होनेवाला,लेकिन फिरसे बोलंनाच पड्या मित्रा तू सबका यार है .
ReplyDelete