Sunday, 28 June 2015

मधुराधिपतये अखिलम मधुरम् (बालगंधर्व) - पु.ल.देशपांडे

मधुराधिपतये अखिलम मधुरम् (बालगंधर्व) 



(बालगंधर्वाच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात 'पुलं'नी त्यांच्याविषयीच्या अतीव आदराने केलेलं हे दुर्मिळ भाषण )
"मित्रहो, भाषणाच्या सुरुवातीला मी इतक्या वर्षांचा निर्ढावलेला माणूस असूनही घाबरून गेलो आहे. भाषणाला मुद्दे नाहीत म्हणून नाही, तर इतके मुद्दे आहेत की काय बोलावं ते समजत नाहीये.
बालगंधर्व या विषयावर मी काय बोलणार? उद्या जर कुणी सांगितलं की ‘चांदणं’ या विषयावर बोला. तर काय बोलणार? आपल्याला बोलता येत नाही हे न कळणारा माणूसच कदाचित बोलू शकेल.
बालगंधर्वाच्या प्रेमाने आजही इतकी माणसे एकत्र येताहेत हाच मुळी एक अद्भुत चमत्कार आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा घट्ट आहे हे सिद्ध करणारी ही गोष्ट आहे. महाराष्ट्राची तीन सांस्कृतिक दैवतं आहेत. शिवाजी महाराज, लो. टिळक आणि बालगंधर्व! महाराष्ट्राने या तिघांवर भरभरून प्रेम केलं. त्यांना विभूतीमत्व दिलं. लोकप्रियता एक वेळ मिळते, पण विभूतीमत्व मिळत नाही. बालगंधर्वाविषयी अधिकारवाणीने बोलावे एवढा मला अधिकार नाहीये आणि त्याची मला जाणीव आहे ही त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट! मात्र एक सांगतो, तो अधिकार मला मिळण्याची शक्यता आहे. बालगंधर्व ज्या मार्गाने कलेकडे गेले तो मार्ग अनुसरला तर आपल्याला त्यांच्याविषयी (निदान) बोलायचा अधिकार मिळू शकतो.
बालगंधर्व हे भक्तिमार्गी कलावंत होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेकडे अगदी प्रेमात पडून पाहिलं. त्यांनी एखाद्या भूमिकेचा विचार केला, चर्चा केली असं मला वाटतच नाही. ‘एकच प्याला’तली सिंधू त्यांनी वाचली, ऐकली आणि ते सिंधू होतच गेले. मात्र त्या तन्मयतेत त्यांनी स्वत:ला वाहू दिलं नाही. ते नुसतेच प्रतिभावंत नव्हते तर उत्तम प्रज्ञावंतही होते. परिष्करणाची तर त्यांना अतिशय आवश्यकता वाटायची. त्यामुळे त्यांची भक्ती आंधळी न ठरता डोळस ठरली.


Balgandharv


Late. P.L.Deshpande

बालगंधर्वाच्या गायकीबद्दल बोलायचं तर भारतीय संगीतातल्या गायकीबद्दलच बोलायला पाहिजे. ते नाटकात गायले म्हणून ती नाटकातली गायकी असं म्हणणं चुकीचं ठरेल. बालगंधर्वाचा यमन आणि भास्करबुवांचा (बखले) यमन यांची जातकुळी वेगळी नव्हती. कारण फक्त निराळं होतं. अर्थात बालगंधर्वाना अजून एक दैवी देणगी लाभली होती. ती म्हणजे त्यांचा स्वर हा जन्मजात भिजलेला स्वर होता. त्याला अंत:करणातल्या प्रेमाच्या ओलाव्याचा स्पर्श होता. बालगंधर्वाची म्हणून एक खास गायकी होती. त्यांच्या सगळ्या भूमिका बघा. त्यातलं जे प्रेम आहे ते सुसंस्कारीत प्रेम आहे. ‘सुखविलासी सोडी न विनया’ अशा प्रकारचं प्रेमाला सुखसंवेदना स्फुरावी असं ते प्रेम आहे. त्यांनी स्त्रीभूमिका केल्या. त्यातून स्त्रीत्वातलं जे जे काही पवित्र, सुंदर, सात्त्विक अशा प्रकारचं आहे त्याचं त्यांनी आपल्या अभिनयातून दर्शन घडवलं. म्हणूनच लोकांची त्यांच्यावर भक्ती जडली.
माझ्या बाबतीत म्हणाल, तर वयाच्या ६-७ व्या वर्षांपासून बालगंधर्वाच्या संस्कारात वाढलेला मी एक मुलगा आहे. (पूर्वी मुलगा होतो- आता राहिलेलो नाही, पण बालगंधर्व म्हटलं की मला माझं मुलगेपणच आठवतं) बालगंधर्वाचं नाटक म्हणजे आमच्या घराचा एक कुळाचारच होता. कुलदैवतेला जसं दरवर्षी जातात तसं आम्ही दरवर्षी बालगंधर्वाच्या नाटकांना जायचो. त्यांची नाटक कंपनी मुंबईत आली की त्यांचं नाटक आपल्या मुलांना दाखवलंच पाहिजे हा संस्कार त्यांच्यावर झालाच पाहिजे अशी जिद्द- आवड- ओढ असलेले आई-वडील मला मिळाले हे मी माझं सगळ्यात मोठं भाग्य समजतो. घरामध्ये एखादं लग्नकार्य असावं अशा तऱ्हेने लोक नाटकाला यायचे. ती नाटकं म्हणजे एखाद्या धार्मिक संस्कारासारखा उत्सव असायचा. असा उत्सव मी परत पाहिला नाही. नाटकांची लोकप्रियता पाहिली. माझीही नाटकं काही लोकप्रिय झाली (चुकून!) पण लोकांचा असा अमाप उत्साह मी पाहिला नाही. एखाद्या लग्नकार्याला जावं तसे कपडे घालून, नटून-थटून लोक नाटक बघायला यायचे. नाटकातल्या सुभद्रेपेक्षा ते बघायला येणारी बाईच जास्त नटलेली असायची. कारण ते फक्त नाटकाला जाणं नसायचं तर एक प्रकारचा उत्तम सांस्कृतिक अनुभव घेणं असायचं. अशा वृत्तीने लोक जायचे आणि बालगंधर्वही अशा वृत्तीने जाणाऱ्या लोकांच्या पदरात पुरेपूर माप टाकायचे.
पडदा वर जायचा. रंगमंचावर लाईटस् पडायचे. ‘प्रभुपदास नमित दास’ म्हणून नांदी सुरू व्हायची आणि खरं सांगतो, ज्या क्षणी- हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत याचा अभिमान वाटतो- असा तो क्षण असायचा. असे असंख्य क्षण ज्या माणसाने आपल्याला दिले त्या माणसाचं नाव नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व! त्यांनी आम्हा सगळ्या लोकांच्या क्षणाचं, आयुष्याचं सोनं करून टाकलं!
नारायणरावांनी जे केलं ते अमूल्य होतं. बिनतोड होतं. ‘नाथ हा माझा’ मधल्या यमनाची काय किंमत ठरवणार तुम्ही? एक गोष्ट सांगतो, नारायणरावांनी जरूर नसलेलं असं काहीच केलं नाही. असं वाटायचं की ही तान इथेच पाहिजे होती. मोठय़ा कलाकारांचे हे वैशिष्टय़ आहे, त्यात दुरुस्ती सुचविता येत नाही. ताजमहालमध्ये थोडी अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणता येत. बालगंधर्वानी जे केलं त्याला पर्यायच नसायचा. शिवाय आपण काहीतरी विशेष करून दाखवतोय असा आविर्भावही त्यात नसायचा. हे घडतंय, हे होतंय असंच वाटायचं. त्यात एक सहज बरोबर जन्मलेला नैसर्गिक भाव असायचा. नाटकात एखादं राजाचं पात्र असतं. त्याने कुणाला शिक्षा केली तरच तो राजा ठरतो असं नाही. त्याचं वागणं बोलणं असं असलं पाहिजे हा राजा आहे. हा भाव तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. बालगंधर्व जे काही करत होते ते सहजतेनं करत होते. तद्रूप होऊन करत होते. ते काहीही सिद्ध करण्यासाठी गात नव्हते. ते फक्त गात होते. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला, अक्षराला, लयीला धरून ते गात होते.
संगीत नाटकं आल्यावर बरेचसे समीक्षक- जे संगीतातले औरंगजेब होते, ते म्हणाले, संगीत आणि नाटक यांचा गोंधळ केला. अहो, संगीताने काय गोंधळ केला, संगीत ही गोंधळ करणारी विद्या आहे का? ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील, पण तो संगीताचा दोष नव्हे. हे म्हणजे फुलांनी पूजेचा गोंधळ केला म्हणण्यासारखं आहे. या लोकांना आपली परंपरा किती माहीत नाही याचं एक उदाहरण सांगतो. एकदा एक महान समीक्षक मला म्हणाले, काय तुमचे ते बालगंधर्व! ते ‘कशी या त्यजू पदाला’ गाणं म्हणत असायचे, तेव्हा तो सिंधूचा बाप नुसता मख्खासारखा उभा! मी म्हटलं, साहेब, सगळं ऑडियन्स ‘कशी या’ गाणाऱ्या बालगंधर्वाकडे तल्लिन होऊन बघत असताना तुम्ही सिंधूच्या बापाकडे कशाला बघत बसलात? म्हणजे नाटक कसं बघावं हे ज्यांना कळत नाही, त्यांना संगीत नाटकांचा परस्परसंबंध कसा कळणार?
जेव्हा गद्य शब्दांची शक्ती संपते तेव्हा काव्य सुरू होतं. गाणं सुरू होतं. आईला जेव्हा वात्सल्याचं भरतं येतं तेव्हा ती मुलाला ‘तो एक नंबरचा चमचा घे. तोंडात घाल’ वगैरे सांगत बसत नाही. ती सरळ ‘घास घेरे तान्ह्य़ा बाळा’ असं गायला लागते. तिला जे म्हणायचं असतं ते सुरांच्या मदतीशिवाय म्हणता येत नाही. कीर्तनातही एखादा नाटय़मय प्रसंग उभा करायचा असेल तर गाण्यांचाच आधार घेतला जातो. कल्पना करा, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलेलं आहे, असा प्रसंग आहे. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतोय. तो गद्यात कितीही वर्णन केला तरी अपुराच पडणार. पण त्याच वेळी कीर्तनकाराने उच्च रवात ‘रथचक्र उद्धरु दे, श्रुतीशास्त्र ये फळाला’ असा स्वर लावला की तो कर्ण, अर्जुन, तो एकंदर प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. प्रसंग सजीव होतो. ‘नाथ हा माझा मोही खरा’च्या प्रसंगी ते आले, त्यांना मी प्रथम पाहिले म्हटल्यावर तिला जे वाटलं, ते तिनं पद्यातच म्हटलं पाहिजे. गद्यामध्ये ती शक्ती नाहीये.
मानापमानातला ‘नाही मी बोलत नाथा’चा प्रसंग घ्या. (बायका जेव्हा ‘काहीतरी बोलू नका’ असं म्हणतात तेव्हा त्यांना ‘काहीतरी बोला’ असं म्हणायचं असतं. स्त्री जेव्हा ‘चला’ म्हणते तेव्हा उठून जायचं नसतं. बसायचं असतं. हे समीक्षकांना कळणार नाही.) ‘नाही मी बोलत नाथा’ हे बालगंधर्व किती प्रकारे सांगतात? ज्यांना गाणं कळत नाही, त्या मूर्ख लोकांनी त्याला ‘दळण घालणं’ म्हटलं. त्यांना कळलंच नाही ते. ‘नाही मी बोलत’ हे ५० वेळा नव्हे तर ५० तऱ्हांनी म्हटलेलं असायचं. एकासारखी दुसरी नाही. दुसऱ्यासारखी तिसरी नाही. उगीच नाही बालगंधर्वाची साथ करताना मी- मी म्हणवणाऱ्या तबलजींची बोटे दुखून येत. लयीतल्या सूक्ष्मातिसूक्ष्म बदलाची त्यांना जाणीव होती.
काहींनी त्यांच्या गाण्यांवर आक्षेप घेतला की तिथे नाटक थांबायचे आणि गवई गात सुटायचे. वास्तवात कुणी गातो का? आता त्यांना काय सांगावं? नाटक ही गोष्टच मुळी अंतरंगातली वास्तवता घेऊन येते. बहिरंगातली नव्हे! बहिरंगातली वास्तवता त्यात येईलच कशी? लोक तिकीट काढून नाटकाला येतात, पडदा वर जातो तिथे प्रॉम्टर असतो. त्यातला शिवाजी, शिवाजीच्या मिशा सगळं खोटंखोटंच असतं. पण हे खोटं नाटक आपल्याला जीवन किती खरं आहे, विविधांगी आहे हे सांगत असतं. नाटकातलं गाणं हे कृत्रिम वगैरे काही नाही. तो त्याचा एक भाग आहे. लंगडीच्या खेळात कुणी म्हटले, दोन पाय असून एका पायाने कशाला धावायचे, तर त्याला काय उत्तर देणार? तो खेळच तसा आहे. तसं नाटकाचं आहे. गाणं नाटक थांबवत नाही. ते नाटक बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं आणि नाटक पुढे नेतं. बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा डेक्कनक्वीनसारखा ठराविक वेळ ठराविक स्टेशनं घेत केलेला (आखीव-रेखीव) प्रवास नसतोच मुळी! तो एका सुंदर उद्यानाचा फेरफटका आहे. त्यातली प्रत्येक सुंदर जागा बघत, सौंदर्यस्थळं निरखत रमतगमत केलेला तो एक उन्मुक्त फेरफटका आहे.
भारतीय संस्कृतीत संगीताला मोठं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आमचा तत्वज्ञानपर ग्रंथ- गीता- हा पद्यात आहे. लग्नामधल्या मंगलाष्टकांना दुसरी (उडती) चाल लावून बघा. लग्न लागण्याऐवजी मोडलं असं वाटेल.

नाटक हा एक यज्ञ आहे. त्यात सगळे कलाकार आपापला हविर्भाग अर्पण करतात. नट येतो. अभिनय करतो. गायक येतात. गातात. नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, तबलजी, सारंगिये येतात. प्रत्येक जण आपली आहुती अर्पण करतो. बालगंधर्वानी आपल्याला काय दिलं? जीवनामध्ये सौंदर्य हे एक मूल्य आहे हे मनावर ठसवलं. सुबकपणे जगणं, सुरेख रीतीने मांडणी, गाणं शिकवलं. बरं हे सर्व अगदी सहज रीतीने शिकवलं. स्त्रीत्वात जे काही मोहक, सुंदर, मधुर आहे ते त्यांनी अभिनयानं दाखवलं. म्हणूनच ५-५ पिढय़ांनी त्यांचा अभिनय बघितला. बालगंधर्व म्हातारे होऊ शकतील, पण लय म्हातारी होणार नाही. त्यांनी मात्रांचा हिशेब बोटांवर नाही घातला. अंत:करणात घातला. म्हणूनच त्यांचे संगीतशास्त्रीय प्रमाद त्यांचे गुण ठरले. त्यांनी भीमपलासात शुद्ध निषाद लावला. इतर कुणी लावला असता तर संगीताच्या रखवालदारांनी ते करणाऱ्याची जीभ कापली असती. बालगंधर्वाच्या बाबतीत हे फक्त तुम्हीच करू शकता, असं म्हणून सर्वानी त्यांचे पाय धरले. एकदा बालगंधर्वाचा षडज् ऐकताना भीमसेन (जोशी) म्हणाला होता, आपल्या तंबोऱ्याच्या भोपळ्यांची भाजी करून खावी! खरं आहे ते! बालगंधर्व फार थोडे आणि सोपे राग गायले. फार मोठे राग गाऊन आपण काही करामत करतोय असं त्यांना दाखवायचंच नव्हतं.
बालगंधर्वानी खूप वेडेपणा (अव्यवहारीपणा) केला. हजार-हजार रुपयांचे शालू घेतले. पण ते नारायणराव बालगंधर्वासाठी नव्हते. तो शालू द्रौपदीचा होता. सुभद्रेचा होता. राजा भीष्मकाच्या राजकन्येचा होता. मायबाप प्रेक्षकांच्या मनावर रुक्मिणी ठसावी म्हणून होता. ते सगळं रंगदेवतेसाठी होतं. प्रेक्षकांसाठी होतं. त्यांची तारीफ करून आम्हाला काय मिळवायचं? त्यांच्या हाती कुठली सत्ता होती? ते मंत्री नव्हते, उपमंत्री नव्हते. क्रेडीट सोसायटीचे चेअरमनही नव्हते की एखादं लोन पास करतील. पण खरं सांगायचं तर त्यांनी इतका आनंद दिला की त्यांचे ऋण फेडताच येणार नाही.
बालगंधर्वाबद्दल बोलणं संपणारच नाही. त्याचा कधी कंटाळा येणार नाही. चांदण्याचा, गंगेच्या ओघाचा, गुलाबाचा, जाईच्या सुगंधाचा कधी कंटाळा येईल का? वल्लभाचार्य म्हणतात, ‘रुपं मधुरम्, गीतं मधुरम्, वचनं मधुरम्, नयनं मधुरम्, हसितं मधुरम्, चरितम् मधुरम्, ललितं मधुरम्, मधुराधिपतये अखिलं मधुरम्.’
गदिमा म्हणाले, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ ते सर्वस्वी खरं आहे. त्यांच्या शंभराव्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचं संकीर्तन करायची मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. कुणीतरी म्हणालं, बालगंधर्वाचा तीन दिवसांचा महोत्सव करावा. मी म्हणतो तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यात सर्वकाळ बालगंधर्वाचा, कलेचा, कलाप्रेमाचा उत्सव साजरा होवो. 
हीच माझी शुभेच्छा !"

- पु.ल.देशपांडे

सौजन्य : समीर सप्रे & मान. जयेंद्र जयंत साळगावकर (कालनिर्णय परिवार)



Friday, 20 March 2015

शाहीर, आपणास भावपूर्ण आदरांजली..

मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपलाय. महाराष्ट्राची लोकधारा आणि ‘जय जय महाराष्ट्र’ महाराष्ट्राभिमान गीतातून महाराष्ट्राची महती पोहचवणारे शाहीर साबळे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून त्यांनी मोलाचं योगदान दिलं.
“गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा..”‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर मूळचे सातारा जिल्ह्यातल्या, वाई तालुक्यातील पसरणी गावचे, जन्म 1923 चा. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचं बाळकडू मिळालं. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा साने गुरूजींशी संपर्क आला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 

1942 ची स्वातंत्र्य चळवळ, गोवा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांमध्ये शाहीर साबळेंनी महाराष्ट्र गाजवून सोडला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या चळवळीत लोकजागृती करण्यात महत्वांचं योगदान होतं हे शाहिरांच्या गाण्यांचं. लोकनाट्यात बदल करून त्यांनी मुक्तनाट्य निर्माण केलं. त्यांनी लिहिलेल्या मुक्तनाट्यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील पहिला प्रयोगही त्यांनी केला.त्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं तर सर्व विक्रम मोडून काढले.
1954-55 मध्ये एच.एम.व्ही. चे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले ते शाहीर साबळेंच. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोकगीतं गोळा करून त्यांनी त्याचं जतन केलं. पद्मश्री, संगित नाटक अकादमीच्या पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘माझा पवाडा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
साबळे हे फक्त शाहीर नव्हते ते उत्तम कवी होते, ढोलकीवादक होते. अभिनेते होते मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, तर शाहीर साबळेंसारखं अशी पावती पु. ल. देशपांडे यांनी त्यांना दिली होती. महाराष्ट्राचा हा बुलंद आवाज आता शांत झाला तरी त्यांच्या पोवाड्यांचे सूर कायम गर्जत राहणार आहेत. एक कलाकार म्हणून शाहिरांचे असणारे अनन्य साधारण योगदान हा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. वारकरी संप्रदायातील असणारे त्यांचे मूळ कुटुंब आणि त्यास मिळालेली लोककलेची अद्भुत जाण, ओव्या रचणाऱ्या आईमुळे लाभलेले शब्दसामर्थ्य याचा वारसा 'शाहिरां'नी सार्थ ठरवला. मायबाप देणे मायबाप रसिकांप्रती त्यांनी कायमच लेणे करून ठेवले. बासरीवर त्यांचे अतिशय प्रेम होते. आपल्या कलेइतकेच प्रेम आपल्या मातृभूमीवर करणारा हा कलावंत होता. 'जातीयवाद की समाजवाद' हा पहिला पोवाडा त्यांनी रचला आणि सर्वाना अचंबित केले. १९४७ पासून शाहीर जनमाणसात 'लोकशाहीर' म्हणून नावारूपास येण्यास सुरुवात झाली. 'आंधळं दळतंय', ' महाराष्ट्राची लोकधारा' या त्यांच्या कलाकृतींना उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. 'अरे कृष्णा, अरे कान्हा', 'विंचू चावला', 'आठशे खिडक्या नवशे दारं', 'दादला नको ग बाई', 'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला' तसेच 'पयल नमन' यांसारखी अनेक गाजलेली लोकगीते त्यांनी या कलाप्रांतास अर्पण केली. शाहिरांचे योगदान अनमोल आहेच पण, प्रेरक देखील आहे. 'शाहीर अमर शेख पुरस्कार' त्यांना लाभला, वास्तविक 'अमर शेख' यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 'दिल्ली'ला दिलेली धडक हा अत्यंत महत्वाचा प्रसंग म्हणून ओळखला जातो, अन त्यांचेच वारस असणारे हे योध्ये कलावंत माणूस म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून किंवा एक जनता कलावंत म्हणून जितके उंचीवर गेले तितकेच त्यांनी रोवलेले लोककलेचे बीज आता तरुण पिढीसमोर असणारा वटवृक्ष झाले आहे. त्यास जोपासण्याचे कार्य करणाऱ्या प्रत्येकास, नवकलावंतास मिळालेले यश आणि महाराष्ट्राच्या समृद्ध, जन्मदत्त लोककलेची झालेली जोपासना हीच शाहिरांना खरी आदरांजली ठरेल. शाहीर, आपणास भावपूर्ण आदरांजली..  महाराष्ट्राच्या या लोकशाहीराला 'युनिटी परिवाराची' श्रद्धांजली.
साभार - आय. बी. एन. लोकमत वेबसाईट.
संपादन : शुभंकर करंडे
©युनिटी मिडिया नेटवर्क २०१५
('युनिटी ग्रुप्स इंडिया'ची स्वायत्त संस्था)
www.unitygroups.in
magazine.unity@gmail.com

नोंद : सदर संपादन 'युनिटी ग्रुप्स इंडिया'च्या संस्थापक अध्यक्षांनी केले आहे. 
सर्वाधिकार राखीव.
कार्यकारी संपादक - हर्षद वैद्य
सह संपादन - प्रतिक जावळे 

Friday, 14 February 2014

काव्यप्रपंच

काव्यप्रपंच


माझा या उपक्रमासाठीचा पहिलाच ब्लॉग. म्हणून ठरवलं कि आजचा ब्लॉग हा आमच्या पिढीला किंवा तरुणाईला समर्पित. आज आपल्या आई-वडिलांकडून किंवा आधीच्या पिढीकडून एक ओरड ऐकू येते कि आजची तरुणाई हि कुठे तरी भरकट्ल्ये किंवा आजच्या तरुणापुढे नीट दिशा नाहीये. पण खरं सांगायचं तर तसं नाहीये. आजच्या पिढीला मागच्या पिढीपेक्षा व्यवसायाच्या वेगळ्या वाटा उपलब्ध आहेत, आणि त्याचबरोबर दरदिवशी अत्यंत वेगाने बदलतं तंत्रज्ञान आणि त्याहीपेक्षा अनेकपट वेगाने बदलत असलेलं आयुष्य आजच्या तरुणाच्या वाट्याला आलंय. आणि किंबहुना त्याचमुळे आजच्या आणि आधीच्या पिढीमध्ये एक वाढती ‘Generation Gap ‘ निर्माण झाली आहे.

पण हे जरी कितीही खरं असलं तरी दोन्ही पिढ्या हे नक्की मान्य करतील कि आयुष्यातला सगळ्यात सुंदर, अमूल्य आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर rocking आणि happening काळ म्हणजे तरुणपणातले दिवस. त्या दिवसांची मजाच वेगळी असते. मित्र, कट्टा, प्रेम, राडे आणि पुन्हा तेवढ्याच प्रेमाने एकत्र येणं म्हणजे खरं तर तरुणाई. त्या वयात एक बेधुंदपणा असतो, जबाबदारीचं ओझं खांद्यावर नसतं आणि म्हणूनच कि काय एक वेगळीच उर्जा या वयात आपल्यामध्ये असते.
याच उर्जेला, बेधुंदपणाला, आणि त्या अवखळ वयाला सलाम करून हा काव्यप्रपंच...


शाळा संपल्यानंतरचं जगातलं पाहिलं पाउल,

म्हणजे तरुणाई...
कॉलेज मधला पहिला दिवस,
म्हणजे तरुणाई...
नव्या जगात वावरताना
मनातली एक अनामिक हुरहूर,
म्हणजे तरुणाई...

मित्रांचा मनसोक्त कट्टा,

म्हणजे तरुणाई...
कट्ट्यावरचा वाफाळता कटिंग चहा,
म्हणजे तरुणाई...
मित्रांसोबत ओढलेली पहिली सिगरेट
पहिल्यांदा लपवून प्यायलेला दारूचा ग्लास,
म्हणजे तरुणाई...

कट्ट्यावर घातलेले राडे,

म्हणजे तरुणाई...
मनसोक्त घातलेल्या शिव्या,
म्हणजे तरुणाई...
आपापसातले मतभेद,
म्हणजे तरुणाई...
जिवलग मित्रांशी झालेलं भांडण,
पुन्हा भांडण मिटवून परत एकत्र मारलेला डायलोंग,
“ तेरी मेरी यारी, मग भोकात गेली दुनियादारी”
म्हणजे तरुणाई...

नवथर वयात दिसलेली “ती”

म्हणजे तरुणाई...
नजरेला भिडलेली पहिली नजर,
म्हणजे तरुणाई...
कधी जमलेलं, तर कधी फसलेलं प्रेम,
म्हणजे तरुणाई...
पण “ती” ने हो म्हटलं कि सगळ्या दोस्तांना,
‘ साल्या तुझी वहिनी आहे ‘ अशी करून दिलेली ओळख,
म्हणजे तरुणाई...

पालकांशी होणारे मतभेद,

म्हणजे तरुणाई...
मांडलेली स्वतंत्र मतं,
म्हणजे तरुणाई...
नवीन technologyचा वापर,
म्हणजे तरुणाई...
Facebook, Whatsapp वर व्यस्त असलेली Generation
आणि त्यामुळे वाढती Generation Gap,
म्हणजे तरुणाई...

तरुणाई...

उत्साहाचा खळाळता झरा
आयुष्याचा खरा अर्थ
उत्कट भावनांचा मिलाप,
अल्लड, अवखळ, तरी स्वतंत्र
जगावेगळा विचार...
म्हणजे तरुणाई...





- सौरभ सोहोनी...                

Saturday, 8 February 2014

Moment

Story!

‘I smiled at you because I thought that you
Were someone else; you smiled back; and there grewBetween two strangers in a librarySomething that seemed like love; but you loved me(If that’s the word) because you thought that IWas other than I was. And by and byWe found we’d been mistaken all the whileFrom that first glance, that mistaken smile.’ 

Mistaken, Vikram Seth.

Riya told me once that when you love someone, you’ll do anything and everything for them, whatever the personal cost. That’s how it is. That’s how love is. There’s right even in the wrong. And there’s comfort even in the hurt. She said love can only be given, it’s selfless, and it cannot be sought.  I laughed and she was anxious to know what was funny in that. I told her that everybody knows that love can only be given and yet we long to be loved, such an irony. She looked at me, the way she always did when she said something and I contradicted it, the usual thoughtful glance.
I know the reason, she had said. This longing, it is the empty loneliness within. And at certain points in life we feel only a particular person can fill it up. That’s just a lie we tell ourselves. Anyone can do that.
I should have told her that it’s not so. The vacuum left behind by a loved one cannot be filled by others. Time heals the pain but the scars remain.  We both were young then, crazy college students, anxious, curious and jostling around corners and discovering our sexualities. Love and sex are two things and we often confuse them, but that’s the essence of the youthful exuberance. Life would be so boring if not for all the risks, mistakes and experiences….

I woke up to the low, pleasant chirping sound of sparrows at the bedroom window. The sparrow couple whined for a while on the iron bars of window gallery before they flew away. I looked at her. She lay on her stomach, with her naked leg stretched out upon me and her right hand over my chest. I yawned lazily and sat upright, gently putting her leg and hand away.  She was fast asleep and don’t know why I just felt at peace looking at her. I leaned in ahead, almost instinctively, and tenderly placed a kiss on her cheek.
“Hey,” she murmured beneath her breath, pushing my face playfully. I smiled to myself and stared at her for long seconds. She rubbed her eyes like a five year old, yawned, and shifted her positions before she finally looked at me. I peered deeply in her raven black eyes. I was spell-bounded, thoroughly mesmerized by a warm and delightful feeling that flooded my heart. I loved every bit of those auspicious moments; they had a magic touch with them.
“Only if I could do this forever,” I still held her gaze as she smiled lopsidedly. I stroked her hair softly; she was my baby, my world.
“You’ll never stop being a romantic moron,” she winked with a devilish grin, “will you?”
I leaned in, holding her face in my palms, just a couple of centimeters away, “Should I?”
 She gestured a no, rubbing her nose to mine.
“You know, you are a cute romantic bastard.”
“Really…?” I bit her right ear lobe and at that very moment she punched a pillow in my face, pushing me away.
“And a loveable lusty scoundrel…” I dodged another pillow shot before I strategically jammed a pillow at her, putting her down in bed. Then out of the blues, like a thunder bolt she pulled a blanket over me, taking me completely off-guards and then there was a shower of pillows from all possible direction.
I pulled a blanket over us as she pushed me down in the bed, getting over me.
 “Cheater…”
“Look, the kid is crying now.” She made a face with her tongue out. I grabbed her and pulled her down. In the dark blanket her face seemed like crescent moon at twilight. Her raven black eyes, had an unspoken rather a vehement appeal. Her face was just above mine; her hair fell upon my face as I felt her body pressing against mine. There was a strange feeling, my hearts beats were getting intense. I could hear heart beats too.
“We are in a fairy land, just you and me,” She whispered softly, “This is our world.”
“And I want this to last forever.” I dashed my forehead against hers mischievously. She hugged me tightly and at that moment I realized she was weeping.
“Hey,” I felt the moisture of her tears on my cheeks as her face gently brushed against mine.
“Why?”
I didn’t answer her. I put her down. We both rested our heads on the pillow with a blanket over us and just stared at each other for a while. Her deep set black eyes were glistening with tears. I looked away for a moment. Everything seemed like a mirage. I somehow wanted to make her feel comfortable; I wanted to run away to a place where there wouldn’t be any sorrow. I just wanted to shut the world around. There was a chaos erupting within.
“Don’t worry,” I held her closer “we’ll make it through.”
“Would we?” 
I took her hand, placed her palm on my chest as our gaze met, “The world my take away everything I have but you reside in here,” I pressed her palm gently on my chest, “You are a part of me, no one can take you away. No one else ever can make me feel the way you made me feel…I don’t know is it right or wrong… All that I can say is that it’s wonderful, this love that we share, it’s a good thing… and good things never die.” 
She gave a wan smile. I wiped a tear rolling down her cheek and hugged her.
“We will surely meet again someday…Someday when you’ll be a published author. Someday when I’ll read about you in the news paper….promise me you’ll marry a good girl who’ll take care of an idiot like you…” Her voice almost trailed off in a fit of sobs, “promise me we’ll meet again.”
“I promise,” I played with her hair that flicked upon her eyes, “And then we’ll have a sizzling extramarital affair…. What do you say?”
“Fucker…” She chuckled and pushed me away. My world bloomed with happiness as I saw a broad smile lit upon her face.
“Naughty America: The cheating wife, my wife’s hot friend… Kya bolti hai? Huh” 
“Porn freak!”
“Tonight’s girlfriend will be more appropriate na?” And with that she slammed the pillow in my head.
The sky is crowded with grey clouds. It will rain heavily today. I sit at the balcony, submerged in my lonely self. Times have changed now. The world has moved leaps and bounds. Riya got married and moved to Delhi. I don’t know whether she loves me or not. Perhaps she did. Perhaps she didn’t. But we were two strangers, on two different paths but I’m glad our paths converged at least for a brief moment. There was no regret. I believe that’s what’s more important: to live a regret free life. Riya is a fading memory, another reason to smile. It’s hard to believe that she’s gone. But at the end we are humans, we ought to change with time, we ought to adapt. That’s what we are made for. I think I’ll adapt too.
But will I be able forget her? Can we ever forget our true love?


Onkar Surve
Mulund, Mumbai 



© Unity Media Network 2014






Tuesday, 4 February 2014

My Journey-Lohagad Trek

Lohagad makes an ideal trekking destination for trekkers from Pune and Mumbai because of its accessibility, ease of trek and lush green surroundings. Keeping this in mind, our coordinators selected this beautiful place for our trek. Our group consisted of all young trekkers from Mumbai and Pune. We were almost 200 people and 70% of us were first time trekkers.
I had known that trekking route to Lohagad is very easy and it is an ideal “1st Trek experience” with picturesque scenery, lush green grass, cool mountain air and the pleasant salubrious climate. It was my 1st trek so I was very excited. I started from home at around 5.00 a.m. and reached Dadar station. Plan was to go to Lonavala by Indrayani Express and then by local train to Malavli. It was start of September and the atmosphere was very cool. All picnic games, songs made the ambiance more interesting and fun in the train. After getting down at Malavli, the scenic beauty made me offensant. The feeling was very pleasant. As I headed towards the fort, I was astonished with the beautiful, charming and lovely village scene. It was simple tar road towards the fort and while on way, I saw various trees with different species and their attractive flowers.

            Lohagad, the Iron fort is at an elevation of 3450 feet. It was conquered by Shivaji Maharaj in the year 1648. Initially the road was very clear with few turns. Later it became rocky and muddy. After some height, there were steps till Mahadarwaja. As I wanted to have a real trekking experience, I used shortcuts through trees and rocks instead of road. It was very hard and challenging but it was fun indeed. After reaching the fort, I experienced a hefty feeling. The weather was very calm and cool. The saffron flag blew gorgeously amidst the fort. I had an amazing photo session with my friends and then I along with my friends went to a small cave-like space for lunch which we brought from home. The day was going really phenomenal.
            Afternoon, I along with my friend went for sightseeing on the fort. I went on a hilly place of the fort to see the scenery from height and it was very wonderful and marvelous. From there at backside of fort, I noticed two beautiful small lakes and a very pleasant place to visit. The beauty near the lake was infinite and I experienced an inner peace of mind and a blissful state. I forgot all hustle and bustle and felt far away from madding crowd. Indeed it was an incredible experience. It felt as if the time stopped and I had an ecstatic feeling.
            While returning, though tired, my mind was elated and I could sense that happiness within. There was bit of history, hard work, some adventure, serene breath taking scenes and lots of sweet memories which made this trek nostalgic.

-OJASWI RAO

                                                                                                                           Ruia College, Mumbai -19

Friday, 31 January 2014

नवनिर्मिती

नवनिर्मिती 

शुभंकर करंडे - युनिटी मिडिया नेटवर्क इंडिया 
एखाद्या सिंहाला किंवा वाघाला उंच झेप घ्यायची असेल तर , काही वेळ प्रतीक्षा करत काही पावले मागे यावे लागते. दबा धरून बसावे लागते तसेच काहीसे आमचे देखील झाले. नव्या रंगात, नव्या ढंगात आणि वैविध्यासह प्रायोगिक तत्वावर आम्ही दिवाळी पूर्वी काही ट्रायल त्रैमासिके काढली. काही महिने नियमित ब्लॉग्स सुरु ठेवले. आणि , या सगळ्यातून आपल्याकडून जे कार्य घडते आहे याचा पाया आम्ही नीट केला. काही शक्यता तपासून पहिल्या आणि पुढील कामांच्या आणि प्रयोजनांच्या अंमलबजावणीसाठी तब्बल ३ महिने आपल्या सेवेपासून थोडेसे दूर राहिलो. परंतु, आमच्या नव्या ओळखीतून आणि आपल्या नव्या सेवाप्रणालीतून आपल्या सोबत आमचा सेवेचा बंध कायमच कार्यान्वित राहील. झाल्या विलंबाबद्दल तसेच, आपल्या सेवेस काही काळ न राहिल्याबद्दल माका आपली  क्षमा मागणे अधिक योग्य वाटते.
Official Logo of Unity Media Network India
नव्या सुरुवातीला नवा आयाम देण्याचा थोडासा प्रयत्न आमच्या कुटुंबाने केला आहे. नेहमीच्या राजकीय आणि गुन्हे, अपघात विषयक माध्यम विश्वातून थोडे दूर जात काहीतरी विधायक आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार प्रयोग करण्याची मन:पूर्वक इच्छा आहे.
अतिशय वेगळ्या विश्वाची नवीन सुरुवात आणि नवी पायरी ओलांडताना आमच्या सारखे पामर या अथांग अवकाशात झेपावत आहेत. त्याच्या खोलीचा अंदाज नसताना देखील यात, उडण्याचे बळ आमच्या इवल्याश्या पंखाना आपण आशीर्वाद आणि पाठिंबा देऊनच येऊ शकते यात मला नक्कीच शंका वाटत नाही. ही सुरुवात आहे नव्या प्रवाहाची, नव्या स्वप्नांना नवी दिशा देण्याची, आकांक्षांचे क्षितीज न्याहाळण्याची आणि सर्वात शेवटी या देशाच्या सेवेत आजन्म कष्ट करण्याची .. आमच्या 'युनिटी परिवारा'च्या 'सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे' या बोधवाक्यातूनच याची प्रचिती येत असावी. आपल्या केवळ आशीर्वादांवर आम्ही खुश नाही, तर हक्काने आपण आम्हाला सल्ले आणि अभिप्राय कळवा; चुकले तर हक्काने जरूर ओरडा आणि काही चांगले घडले तर मायेने नव्या चांगल्या कृतीसाठी पाठ देखील थोपटा. काही विधायक प्रकल्पांना आपण साथ देखील द्या. शेवटी, कलाकार असो वा लेखक प्रयत्नांचे प्रयोग तर कायम होत जातात पण, त्यांना गरज असते कौतुकाने दखल घेण्याची.. आणि, आपण सारे सुज्ञ भारतीय हे काम चोख कराल याची शाश्वती वाटते.
आज या दिवशी नवी पालवी येऊन सजलेल्या भवतालाचे नवे विश्व साकार करण्यास आम्ही येत आहोत .
स्नेह निरंतर टिकावा!

धन्यवाद! जय हिंद! सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे!

शुभंकर करंडे
हेड मेनेजिंग डायरेक्टर
युनिटी मिडिया नेटवर्क इंडिया

(संस्थापक - युनिटी ग्रुप्स इंडिया)

Tuesday, 28 January 2014

Notice

OUR REGULAR BLOGS ARE STARTING FROM 01/02/2014 ..
THANK YOU!

ADMIN - UNITY MEDIA NETWORK INDIA

(H_Vaidya)

Tuesday, 14 January 2014

Nandi नांदी

नमस्कार,
येत्या काही दिवसातच नव्या नावाने आणि नव्या उमेदीने आम्ही पुनश्य आपल्या सेवेत रुजू होत आहोत.
आमच्या www.unitymedia.webs.com  नव्या संकेतस्थळाचा अवश्य लाभ घ्या!
धन्यवाद!

Namaskar
we are coming shortly for your service with new identity & desire. Please visit our new website @ www.unitymedia.webs.com ..

thank you!

Unity Media Network India 

Like us on facebook 


Wednesday, 1 January 2014

Re-opening status

Unity Media Network (Previous name Magazine World of UGI) is coming with new projects & new activities shortly.

Saturday, 5 October 2013

Declaration -क्षमास्तु| जाहीर निवेदन! सूचना |

We are sorry! We are unable to post BLOGS for next few days on regular basis.. We will revert u back with new format & presentations shortly!
Sorry for Inconvenience!!

हाव सगळ्यांक विनंती करतंय.. आमचे ब्लॉग्स पुढचे काही दिस  सगळ्यांक वाचूक येउचे नाएत.त्याबद्दल दिलीगीर व्यक्त करतंय! हाव नव्या रुपात ब्लॉग्स प्रेझेंट कोरूक सत्तालो.. आमचे नवे प्लान्स अशील्ले ! क्षमा मागतंय हं ...

आम्हास क्षमा करा.. येणाऱ्या काही दिवसांत काही बदल करावयाचे असल्याने आणि नव्या स्वरुपात दर्जेदार साहित्य आपल्या समोर आणावयाचे असल्याने आम्ही ब्लॉग्स बंद ठेवत आहोत! आपल्या गैर सोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो!

हमे क्षमा करे| कुछ  तकनिकी समस्याओंके कारण हम ये ब्लॉग्स आनेवाले कूच दिनो के लिये स्थगित कर रहे है| आपके असुविधा के कारण हमे खेद है| 

क्षमास्तु | 

Wednesday, 2 October 2013

Lal Bahadur Shastri

Lal Bahadur Shastri

Born: 2 October 1904
Passed Away: 11 January 1966

Contributions
He devoted his life for the pride and honor of the country. Shastri was regarded as man of principles. Lal Bahadur Shastri offered his resignation as Union Railway Minister; hours after he was made aware of a train accident that killed around 150 people. He laid the foundation stones of the well-productive schemes like Green Revolutions and White Revolutions. He was the first person to be posthumously awarded the "Bharat Ratna".

Life
Lal Bahadur Shastri was born on October 2, 1904, to Ramdulari Devi and Sharada Prasad Shrivastava, in Moghalsarai, United Province (Uttar Pradesh). He shares his birthday with Mahatma Gandhi, the father of the nation. Lal Bahadur was against the prevailing caste system and therefore decided to drop his surname. The title "Shastri" was given after the completion of his graduation at Kashi Vidyapeeth, Varanasi in 1925. The title "Shastri" refers to a "scholar" or a person, adept in the "Holy Scriptures".

His father Sharada Prasad, a schoolteacher by profession, passed away when Lal Bahadur was barely two years old. His mother Ramdulari Devi took him and his two sisters to their maternal grandfather Hazari Lal's house. Lal Bahadur acquired virtues like boldness, love of adventure, patience, self-control, courtesy, and selflessness in his childhood. After completing his primary education at Mirzapur, Lal Bahadur was sent to Varanasi, where he stayed with his maternal uncle. 

Young Lal Bahadur, inspired with the stories and speeches of national leaders, developed a desire to participate in the Indian nationalist movement. He would also spend time by reading foreign authors like Marx, Russell and Lenin. In 1915, a speech of Mahatma Gandhi changed the course of his life and decided to jump into the fire of Indian freedom struggle. 

In order to participate actively in the freedom movement, Lal Bahadur neglected his studies. In 1921, during the non-cooperation movement, called by Mahatma Gandhi, Lal Bahadur was arrested for demonstrating in defiance of the prohibitory order. Sine he was a minor then, the authority had to release him. In 1928, Lal Bahadur Shastri married Lalita Devi, the youngest daughter of Ganesh Prasad. He was against the prevailing "dowry system" and so refused to accept dowry. However, on the repeated urging of his father-in-law, he agreed to accept only five yards of khadi (cotton, usually handspun) cloth as dowry. 

Active Nationalist
In 1930, Lal Bahadur Shastri became the secretary of the Congress party and later the president of the Allahabad Congress Committee. He played a crucial role during the "Salt Movement". Lal Bahadur lead a door-to-door campaign, urging people not to pay land revenue and taxes to the British authority. The leader was also sent to jail for the campaign. During the long span of nine years he spent in jails, Lal Bahadur utilized the time in reading the social reformers and western philosophers. He was one of the leading and prominent faces that continued the Quit India movement, called by Mahatma Gandhi. Lal Bahadur, in 1937, was elected to the UP Legislative Assembly.

Post Independence
Lal Bahadur Shastri had served in various positions before being elected as the Prime Minister. After Independence, he became the Minister of police in the Ministry of Govind Vallabh Panth in Uttar Pradesh. His recommendations included the introduction of "water-jets" instead of sticks to disperse the unruly mob. Impressed with his efforts in reforming the state police department, Jawaharlal Nehru, invited Shastri to join the Union cabinet as a Minister for railways. He was a responsible man and known for his ethics and morality. In 1956, Lal Bahadur Shastri resigned from his post, following a train accident that killed around 150 passengers near Ariyalur in Tamil Nadu. Nehru, had once said, "No one could wish for a better comrade than Lal Bahadur, a man of the highest integrity and devoted to ideas".

Lal Bahadur Shastri returned to the Cabinet in 1957, first as the Minister for Transport and Communications, and then as the Minister of Commerce and Industry. In 1961, he became Minister for Home and formed the "Committee on Prevention of Corruption" headed by of K. Santhanam.

Prime Minister
Jawaharlal Nehru was succeeded by a mild-mannered and soft-spoken Lal Bahadur Shastri on 9 June, 1964. He was a follower of Nehruvian socialism. Despite the strong influence and desire of becoming the Prime Minister, of some party stalwarts Shastri emerged as the consensus candidate. 

Shastri tackled many elementary problems like food shortage, unemployment and poverty. To overcome the acute food shortage, Shastri asked the experts to devise a long-term strategy. This was the beginning of famous "Green Revolution". Apart from the Green Revolution, he was also instrumental in promoting the White Revolution. The National Dairy Development Board was formed in 1965 during Shastri as Prime Minister.

After the Chinese aggression, the major cross-border-problems Shastri faced was caused by Pakistan. It sent her forces across the eastern border into the Rann of Kuch in Gujarat. Shastri showing his mettle, made it very clear that India would not sit and watch. While granting liberty to the Security Forces to retaliate He said, "Force will be met with force".

The Indo-Pak war ended on 23 September 1965 after the United Nations passed a resolution demanding a ceasefire. The Russian Prime Minister, Kosygin, offered to mediate and on 10 January 1966, Lal Bahadur Shastri and his Pakistan counterpart Ayub Khan signed the Tashkent Declaration.

Death
Lal Bahadur Shastri, who had earlier suffered two heart attacks, died of the third cardiac arrest on 11 January, 1966. He is the only Indian Prime Minister, to have died in office, overseas. Lal Bahadur Shastri was the first person to be posthumously awarded the Bharat Ratna, (India's highest civilian award)


Mumbai                                                           - Reporter
02/10/2013                                                 Magazine World of UGI


©magazine world of UGI 2013
All rights are reserved!


Sunday, 29 September 2013

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा


साभार - युनिटी फिल्म्स आणि आर्ट्स भारत 
एकविसावे शतक म्हणजे यंत्र आणि तंत्र युगाने झपाटलेले . साऱ्याच स्तरावरून बदललेले … याच युगामध्ये वावरणारा आजचा माणूस … पण केवळ स्वतःतच रमलेला … ज्याला समाजाच्या कर्तव्याची काही चाड नाही उरलेली … केवळ पैसा आणि संपत्ती यामध्ये गुरफटून गेलेला माणूस … computerized झालेल्या  संवेदनाहीन माणसांची गर्दी… पण या हजारोंच्या गर्दी मध्ये  स्वतःचा वेगळेपण जपणारी काही माणसे असतात… माणूस म्हणून जगणारी जगणारी काही माणसे असतात. त्यापैकीच एक म्हणजे प्रोफेसर बाळकृष्ण चौगले …
शिक्षण आणि अध्यात्म या दोन्ही आघाड्यांवर आजतागायत न थकता लढत असलेलं एक असामन्य व्यक्तिमत्व ! आरस्पानी बावनकशी मनाचे सौंदर्य लाभलेला हा अवलिया …. अध्यापन आणि अध्यात्म या दोन्ही आघाड्यांवर प्रवाचानासारख्या माध्यमातून समाज सुधारणेचा वसा जपत असणारा एक विचारवंत समाज सुधारक…
३ जुलै १९५५ रोजी कोल्हापूर जवळील 'कसबा बावडा' येथे बाळासाहेबांचा जन्म झाला. येथीलच शाळा नं. १ १ म्हणजेच आजच्या राजर्षी शाहू विद्यालयात त्यांच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले . दंगेखोर असणारे बाळासाहेब मित्रांप्रमाणेच शिक्षकप्रिया होते . अभ्यासू वृत्तीच्या बाळासाहेबांचा वर्गामध्ये नेहमी पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेला असायचा. त्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल आणि नंतर स म लोहिया येथे झाले . पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील प्रसिद्ध कॉमर्स कॉलेज येथे झाले. बाळासाहेबांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या अंगी असणाऱ्या विविध कौशल्यानी यश मिळवून कॉलेज च्या शिरपेचात मनाचे तुरे रोव्ले. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नेहमीच अव्वल असणारे बाळासाहेब १ ९ ७ ३ - ७  ४ मध्ये शहाजी कॉलेज च्या विदेशी खेळ विभागाचे सेक्रेटरी झाले . पुढे आकर्षक व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुण या मु ळे ते महावीर कॉलेज च्या जनरल सेक्रेटरी पदी विराजमान झाले . 
Mr. Balasaheb Chaugale & A poster of UFAAI documentary..
 
बाळासाहेबांनी कॉलेज मध्ये असताना अभ्यास आणि क्रीदाक्षेत्राबारोबारच सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला . महाविद्यालयीन स्तरावर ४ वर्षे 'प्रेम तुझा रंग कसा', 'घेतलं शिंगावर', 'दिवा जळूडे सारी रात' या सारख्या तीन अंकी नाटकातून त्यांनी अभिनयाची चमक देखील दाखवून दिली .
कब्बडी , क्रिकेट , टेबल टेनिस यांसारख्या खेळामध्ये सहभाग घेऊन नंबर मिळवण्याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही आपली ओळख   निर्माण करणारा हा असा अष्टपैलू लाखात एकच !
मित्रांबरोबर मटण च्या पार्टीवर तव मारणारा , टिपिकल कॉलेज  स्तुदांत म्हणून वावरणारा , आपल्या मतांवर ठाम असणारा हा मुलगा पुढील आयुष्यात अध्यात्मिक जीवनात इतकी उंची गाठेल याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती.
 २४ ऑगस्ट १९७९ रोजी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ते कोल्हापूर येथील 'विवेकानंद कॉलेज' मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापनाचे काम करत असताना  लढाऊ बाण्याच्या बाळासाहेबांनी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 'अभयकुमार साळुंखे' यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात  इतर प्राध्यापकांसह लढा दिला. याची परिणीती म्हणजे , 'अभयकुमार साळुंखे' हे या संस्थेचे कार्याध्यक्ष झाले.
अंगी लढण्याचे कौशल्य असणारे बाळासाहेब पुढे 'सुता' या प्राध्यापक संघटनेचे सदस्य झाले. प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या प्रमुख पदाची सूत्रे दिली.
काही वर्षे प्राध्यापक आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या बालासाहेबना या संघटनांमधील अंतर्गत राजकारणाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या समवेत घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे आश्चर्यचकित झालेल्या बाळासाहेबांनी मानसिक, वैचारिक घुसमट झाल्याने १९९२ पासून या संघटनांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.
वाचनप्रिय असणारे बाळासाहेब विविध प्रकारची पुस्तके वाचत असत. कथा, कादंबऱ्या,नाटक यांच्या वाचनाची त्यांना भारी आवड होती. त्याच दरम्यान त्यांच्या हाती पडली, 'संत गाडगेबाबा'यांची चरित्रात्मक कादंबरी 'डेबु'.. या कादंबरीने बाळासाहेबांच्या विचारधारेला धक्के दिले. हादरवून सोडल. आणि बलासाहेबांचे विचार परिवर्तन झाले. त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. गाडगे महाराजांच्या चरित्रापासून मिळालेली प्रेरणेची उर्जा त्यांच्या नसानसात दौडू लागली.आणि त्यांचा कथा, कादंबरी, नाटक - सिनेमा यांचा प्रेम संपुष्टात आले. अध्यात्मिक साहित्याची ओढ निर्माण झाली. भगवतगीता, तुकारामगाथा , द्यानेश्वरी, नामदेव गाथा अशा प्रकारच्या अध्यात्मिक साहित्याचे वाचन त्यांनी झपाटल्या सारखे सुरु केले. आणि त्यांचा प्रवास सुरु झाला सामान्य कडून असमान्याकडे... अधात्माकडे ...
अधायात्मिक क्षेत्रात रंगून गेलेल्या बाळासाहेबांनी अनेक संत , महात्म्यांच्या भेटी घेतल्या. विविध तीर्थक्षेत्राना भेटी दिल्या. ग्रंथ वाचन सुरु करून अध्यात्मिक साधना सुरु केली. आणि या अभ्यासानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यात सद्गुरूंची उणीव भासू लागली. पुढे अपेक्षेप्रमाणे त्यांना गुरु देखील मिळाले.ते म्हणजे, डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा काका. पुढे यांच्या सहवासात मार्गदर्शनाखाली सुरु झाला बाळासाहेबांचा अध्यात्मिक प्रवास...
डॉ. काकांप्रमाणेच त्यांच्या अध्यात्मिक आयुष्याच्या विविध टप्प्यावरती विविध गुरूंचा मार्गदर्शन त्यांना लाभत गेले. सततच्या अभ्यासाने अध्यात्मिक परिपक्वतेकडे त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांनी प्रवचने देण्याचा निर्णय घेतला. आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा या करिता १९९६ पासून त्यांनी प्रवचन सेवेस प्रारंभ केला. आणि अध्यात्मिक क्षेत्रात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी रसाळवाणीने ते भाविकांना मंत्रमुग्ध करणारी प्रवचने देण्याचे काम २०१३ अखेरपर्यंत करत आले आहेत. आजवर त्यांचे २००० पेक्षा जास्त प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत.
माणसाना खर्या आत्म्याचा, मोक्षाचा आणि देवाचा शोध अध्यात्माचा अभ्यास केल्या शिवाय लागणार नाही. धडधाकट युवा पिढीला संत साहित्याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे.त्याशिवाय माणुसकीची ओळख होणे कठीण आहे असा त्यांचा ठाम मत आहे. दिशाहीन भरकटत चाललेल्या समाज, विचारसंस्कृतीला प्रवचनाच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य महत्वाचे आहे असे ते मानतात.
आपले अत्यंत महत्वाचे विचार त्यांनी आकाशवाणी केंद्र, बी चेनेल या सारख्या प्रसारमाध्यमातून नियमित मांडून समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य अव्याहत केले आहे.या शिवाय कसबा बावड्याचे हनुमान भक्त मंडळ, प्रज्ञापुरी येथील स्वामी समर्थ मंदिर, राधा कृष्ण मंदिर येथे ते नियमित जाऊन प्रवचने देतात.

Watch a Documentary on the life of Balasaheb Chaugale here...

अध्यात्माच्या क्षेत्रात कार्यरत असणार्या बाळासाहेबांचे अध्यापनाचे कार्य देखील तितक्याच जोमाने सुरु आहे. 'विवेकानंद'मध्ये अकौंटन्सी विषय शिकवणाऱ्या बाळासाहेबांच्या  लेक्चर वेळी वर्गातील सारी मुले हजर असतात. त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी वैशिस्थ्यापूर्ण कि लेक्चर संपल्याचे भान विद्यार्थी आणि बाळासाहेब यांना राहत  नाही. याचीच पोचपावती म्हणजे त्यांचे अनेक विद्यार्थी बोर्डात चमकले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे सुंदर करियर घडवलंय. आणि मुख्य म्हणजे याचे संपूर्ण  श्रेय  विद्यार्थी सरांना देण्यास विसरत नाहीत.
विद्यार्थ्यांबरोबर बाळासाहेब स्टाफ चे देखील लाडके आहेत, त्यांच्या विषयी सारेच शिक्षक भरभरून बोलतात.
सर्वांचेच भरभरून प्रेम लाभलेले बाळासाहेब कुटुंबियांच्या प्रेमापासुनही पारखे नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या संस्कारातून दिसून येते. अध्यात्मिक आणि शैक्षणिक कामकाज सांभाळत त्यांनी संसार देखील तेवढ्याच जोमाने केलाय. याचीच फलप्राप्ती म्हणजे त्यांची दोन्ही मुले 'अभिजित' आणि 'स्वप्नील' नेव्ही मध्ये कॅप्टन सारख्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
संपूर्ण चौगले कुटुंबामध्ये त्यांच्या बद्दल प्रत्येकाच्याच मनात आदर आहे.
असं हे सर्वांचं लाडके बहारदार व्यक्तिमत्व वयाच्या या टप्प्यामध्ये सुद्धा तरुण आहे. समोरच्या माणसाला नेहमीच ते उर्जा देत असतात. रोज पहाटे लवकर उठून ध्यान करून , कॉलेज मध्ये कर्तव्य बजावून पुस्तके वाचन करणे , प्रवचने देणे अशा शिस्तबद्ध आणि व्यस्त दिनक्रमात ते कधीही थकत नाहीत. म्हणूनच ते स्वतःसह इतरानाही ताजे तवाने ठेवतात.
झपाटून , झोकून कार्य करण्याची वृत्ती , शांत मोकळा स्वभाव , उत्साह , जोम अन काम करण्याची उर्मी त्यांचे हे चिरतारुण्य टिकवून आहे.
'' रंगुनी रंगत साऱ्या.. रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या .. पाय माझा मोकळा''

जणू असंच बाळासाहेबांच आयुष्य!


आंबेवाडी, कोल्हापूर                                                                                                - सतीश स.तांदळे 
२९ सप्टेंबर २०१३                                                                                          विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

©Unity Films & Arts India 2013
All rights are reserved!

Blog writer code - BL02
Blog code - B23

A UFAAI Documentary has ©Unity Films & Arts India 2013!
Thank you!