जयोस्तुते ! जयोस्तुते श्री महन्मंगले
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वां महं
यशोयुता वंदे !
'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या' या मंगल आणि पवित्र शब्दांनी आजच्या चिरायु होणार्या 'भारता 'च्या स्वातंत्र्यदिनी Magazine World of ugi च्या 'blogs ' ना सुरुवात होते आहे! पारतंत्र्य भोगत पाशात अन ब्रिटीशांच्या शृंखलेत अडकून पडलेल्या 'भारतभूमातेला ' आणि माझ्या सर्व कुटुंबियांना, की ज्यांच्यामुळे या 'भारता'चा पुत्र म्हणून जन्मण्याचे भाग्य मला दिले त्यांच्या चरणी नतमस्तक होत हा प्रकल्प अर्पण करावासा वाटतो!
'भारता'चा स्वातंत्र्यलढा हा अनेक अनाम वीरांचा अन वीरांगना यांचा होता. समाजसुधारक अन 'स्वातंत्र्यवीरां'चा होता. भारत स्वतंत्र होऊन आता सुमारे ६६ वर्षे होत आहेत पण, स्वातंत्र्याला आजही खरी व्याख्या सापडलेलीच नाही. आसेतुहिमाचल वसलेल्या या पवित्र 'भारता'त सौंदर्य, संस्कृती,कला, क्रीडा अशा अनेकांना तोड अथवा कमतरता नाहीच! उलट, अभिमानाने मिरवणाऱ्या 'भारता'ला , त्याच्या लावण्याला कुणाची दृष्ट न लागो असे मानण्यासारखे ! खितपत पडलेली दुष्काळग्रस्त जनता, भ्रष्टाचारात गुदमरणारे जीव , फसव्या शेजारी राष्ट्रांनी सीमेवर मांडलेली भौगार्दी, शासकीय उदासीनता, मूल्यांचे अवमूल्यन, लोकशाही कि पक्षशाही?, काहीशी दिशाहीन तरुणशक्ती यात आश्वासाकताच उरली आहे कारण, विश्वासार्हतेला थारा करण्याचा विचारही आता नामशेष होत चालला आहे!
मागील वर्षी 'नाना पाटेकर' यांचा 'साहेबा परत ये ' हा अग्रलेख वाचला होता. 'नाना' जे बोलले ते कुठेतरी पटले. कारण, 'स्वातंत्र्यदिना'च्या पूर्वसंध्येला पाकिस्तान्यांचे हल्ले होणे, बलात्काराच्या घटना, भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट या गोष्टी आता,कदाचित नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यातल्या त्यात 'शिखर धवन'चे द्विशतक हीच काय ती गोड बातमी...
आज आपले 'ब्लोग्स' सुरु होत आहेत. नव्या तारुण्यनाट्याचा शुभारंभ 'readers डेस्क 'च्या पहिल्या अंकाने झालाच आहे!आता ही त्याची 'नांदी'च आहे! आपल्याच 'भारता'च भला व्हावं आणि त्या सत्कर्मी आम्हा साऱ्यांचे हात लागावे ; सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे | हे आमचे बोधवाक्य सार्थ व्हावे अशीच इच्छा आज आहे! जनमानसात जाणिवांचा जागर व्हावा, सुख - मज्जा मस्ती - विरह अशा अनेक भावना सोबत घेऊन जबाबदारीचे भानही राहावे! शेवटी, आकाशाच्या अथांग छायेची उंची आम्हास काय कळणार? तरीही या आकाशाची झेप घेणे आम्हास आत्मबलाचा विश्वास देणारे ठरते!
आजच्या या पवित्रदिनी भारताला शांतता , समृद्धी , सद्गती आणि जो जे वांछील तो ते लाहो भारतभूलोक असेच पसायदान पुनच्च मागावेसे वाटते! आपण सारे भारतीय बांधव आमचे blogs दि.०१ सप्टेंबर २०१३ पासून रोज वाचू शकाल. तसेच , आपण देखील blogs लेखन करून आपले blogs आम्हास magazine .unity @ gmail .com वर पाठवू शकाल. आपल्या सदिच्छा अन पाठबळावर 'भारतभूमी'ची सेवा करण्याचे सौभाग्य आमच्या भविष्यात आजन्म राहो हीच सदिच्छा !
धन्यवाद!जय हिंद!
सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे!
१५ अगस्त २०१३
मुंबई - शुभंकर करंडे
रामनारायण रुईया कॉलेज , मुंबई
लेखक Magazine World ऑफ़ ugi चे संस्थापक अध्यक्ष आहेत। *

No comments:
Post a Comment