आज खरे तर संपूर्ण महाराष्ट्र नारळी पौर्णिमेची आणि रक्षाबंधनाची धूम साजरी करत असताना अचानकपणे घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांमुळे दुःखाच्या खाईत लोटला गेला. सामाजिक चळवळीचा पुरोगामी आवाज असणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज पुण्यात निर्घुण हत्या करण्यात आली. तर माहीम, मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे आजारपणामुळे दुखद निधन झाले.
नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळी मधील अग्रणी होते. अभ्यासू , विचारी, अंधारातून प्रकाशवाटेकडे नेणारे आणि नवचेतना रुजवणारे हे व्यक्तीमत्व , तर दुसरीकडे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा धर्मपंडित हरपतो यासारखा क्लेशदायी दिवस असूच शकत नाही. यासाठीच आपल्यातील या दोन हरपलेल्या great personality ना आणि त्यांच्या मृतात्म्यांना चिरशांती लाभो हीच प्रार्थना!
या करिता हा खास ब्लॉग !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये एक फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेल्या जयंत शिवराम साळगांवकर यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला. घराघरात भिंतीवर दिनचर्येचे वेध घेणारी 'कालनिर्णय' या दिनदर्शिकेचे जयंत साळगांवकर हे जनक आणि संपादक होते. 'कालनिर्णय' ला इतकी लोकप्रियता मिळाली की मूळात ही बारा पानांची दिनचर्या 'दिनदर्शिका' या नावाऐवजी 'कालनिर्णय' शब्दाने संबोधली जाऊ लागली होती. केवळ महाराष्ट्रात सिमीत न राहता, साळगावंकरांनी तब्बल नऊ भाषांतून 'कालनिर्णय' दिनदर्शिका प्रकाशित केली. 'कालनिर्णय' या दिनदर्शिकेची उलाढालही कोटींच्या घरात होती. दिनदर्शिकेत धार्मिक आधुनिकता असावी याकडे त्यांचा नेहमी कल असे. या आधुनिकतेचे प्रतिक म्हणजे 'कालनिर्णय'ची अमेरिकन प्रत काढून त्यांनी अमेरिकेतही 'कालनिर्णय'ला पोहचविले.
त्याचबरोबर दैनिक वृत्तपत्रातून राशीभविष्य आणि शब्दकोडे वाचकांना उपलब्ध करून देण्याची संकल्पनाही जयंत साळगांवकरांचीच. दिवसभराच्या घडामोडींचा वेध घेणाऱया वृत्तपत्रात शब्दकोडे सुरू करून ते लोकप्रियही ठरू शकते हे साळगावंकरांनी सिद्ध केले. त्यानुसार शब्दकोड्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की आजही प्रत्येक वृत्तपत्रात दैनिक राशीभविष्य आणि शब्दकोडे यांना जागा आहे.
आज एकट्या मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) खप ४८ लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे.
कालनिर्णयचे संस्थापक-संपादक असलेल्या जयंतरावांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते.
सार्वजनिक क्षेत्र
श्री सिद्धिविनायक मंदिर , मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी.
आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष.
मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्ष.
श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता , सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक , अध्यक्ष.
श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष.
महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष.
इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष.
दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त.
महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष.
१९८३ अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष.
मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष.
सातारा जिह्यातील विटा येथे झालेल्य विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान , आळंदी यांनी बांधलेल्या श्रीज्ञानेश्वर मंदिराचे सन्माननीय उद्घाटक.
कोल्हापूर येथे २९-३० एप्रिल इ.स. १९९१ रोजी झालेल्या आठव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
मुंबईत झालेल्या अखिल महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे स्वागताध्यक्ष.
श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या विद्यमाने आणि गुरुकुल प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने सातारा येथे झालेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
आणखी कितीतरी ट्रस्टवर आणि सेवाभावी सार्वजनिक संस्थात पदाधिकारी.
लेखन
' सुंदरमठ ' ( समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी)
' देवा तूचि गणेशु ' ( श्रीगणेश ह्या दैवताचा इतिहास आणि स्वरुप , तसेच समाजजीवनावरील त्याचा प्रभाव याचा अभ्यासपूर्ण आढावा).
' धर्म-शास्त्रीय निर्णय ' ह्या ग्रंथाचे संपादन व लेखन
आतापर्यंत विविध सामाजिक , ऐतिहासिक , धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध.
' कालनिर्णय ' या नऊ भाषेतून निघणा-या वार्षिक नियतकालिकाचे (कॅलेंडरचे) संस्थापक-संपादक.
' पंचांग ' ह्या क्षेत्रांत सुलभता आणि शात्रशुद्धता आणण्याचे यशस्वी प्रयत्न. पंचांगाचा परंपरागत साचा बदलून नवीन स्वरूपात पंचांगाचे संपादन.
महाराष्ट्र टाइम्सच्या (ऑनलाइन आवृत्ती) ' प्रातःस्मरण ' या सदरात जानेवारी २००९ पासून प्रत्येक मंगळवारी प्रसिद्ध झालेले लेख
' सगुण-निर्गुण दोन्ही समान ' ( महाराष्ट्र टाइम्समध्ये ' सगुण-निर्गुण ' या सदरातून २००३-२००६ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ११६ लेखांचा (संदर्भ टीपांसह) संग्रह)
' देवाचिये द्वारी ' ( धार्मिक , पारमार्थिक अशा स्वरुपाचे लिखाण संतवाङमयाच्या आधाराने १९९५ मध्ये लोकसत्तात प्रकाशित झालेल्या ३०९ लेखांचा संग्रह).
' सुंदर ते ध्यान ' ( देवाचिये द्वारी भाग-२) (१९९६ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३११ लेखांचा संग्रह).
' अमृताची खाणी ' ( देवाचिये द्वारी भाग-३) (१९९७ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).
' आनंदाचा कंद ' ( देवाचिये द्वारी भाग-४) (१९९८ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).
' ज्ञानाचा उद्गार ' ( देवाचिये द्वारी भाग- ५) (१९९९ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).
' दूर्वाक्षरांची जुडी ' (' देवाचिये द्वारी ' १९९५-१९९९ मधील श्रीगणेशावरील लेखांचे संकलन)
' गणाधीश जो ईश ' ( श्रीगणेशावरील लेख व मुलाखती. वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)
' रस्त्यावरचे दिवे ' ( आयुष्यात घडलेल्या , अनुभवाला आलेल्या , तसेच कोणाकडून तरी समजलेल्या प्रत्यक्ष घटनांवर आधारित साप्ताहिक ' रविवारचा सकाळ ' मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह)
' भाव तोचि भगवंत ' ( दैनिक सकाळ मध्ये ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात २००५-२००६ ह्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १०८ लेखांचा संग्रह)
पुरस्कार आणि गौरव
ज्योतिर्भास्कर(संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली पदवी).
ज्योतिषालंकार (मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली सन्मानदर्शक पदवी).
ज्योतिमार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी).
महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली विद्यावाचस्पती (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.
नाशिकच्या पुण्यश्लोक सद्गुरूच्या शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे ' वैदिक पुरस्कार ' देऊन गौरव.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट सदर लेखनाबद्दल ' भ्रमंती पुरस्कार '.
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ' जीवनगौरव पुरस्कार '.
छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती , मुंबई तर्फे ' जीवनगौरव पुरस्कार '.
महाराष्ट्र कला निकेतन तर्फे सांस्कृतिक कार्यासाठी ' महाराष्ट्र रत्न ' पुरस्कार.
कृष्णमूर्ती ज्योतिष संशोधन मंडळ , मुंबई तर्फे ज्योतिष शास्त्राच्या विशेष सेवेप्रीत्यर्थ ' ज्योतिक कौस्तुभ ' पुरस्कार.
श्री समर्थ सेवा मंडळ , सज्जनगड , सातारा यांच्यातर्फे ' समर्थ संत सेवा पुरस्कार '
रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) , पुणे यांच्या वतीने धर्मसंस्कृती क्षेत्रातील " परम पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार २०१०
ज्योतिर्भास्कर साळगावकरांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही! यांच्या निधनानंतर अवघ्या काहीच वेळात पुण्यनगरीमध्ये एका समाजसेवा पर्वाचा निर्घुण अंत झाला!
तर,
मराठी बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते अशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
जीवन
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या दहा भावंडांपैकी सर्वात धाकटे होय. सुप्रसिद्ध समाजचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.
शिक्षण
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण व इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
सामाजिक कार्य
बाबा आढाव यांच्या "एक गाव- एक विहीर" या चळवळीत नरेंद्र दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या "अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती"मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती" स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या "साधना" या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून संपादक होते.
साहित्य
अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम -राजहंस प्रकाशन
अंधश्रद्धा विनाशाय -राजहंस प्रकाशन
ऐसे कैसे झाले भोंदू -मनोविकास प्रकाशन
झपाटले ते जाणतेपण -संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
ठरलं... डोळस व्हायचंय -मनोविकास प्रकाशन
तिमिरातुनी तेजाकडे -राजहंस प्रकाशन
प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)-राजहंस प्रकाशन
भ्रम आणि निरास -राजहंस प्रकाशन
विचार तर कराल? -राजहंस प्रकाशन
विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी -दिलीपराज प्रकाशन
श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)
असे हे दाभोळकर! या उभयतांना सारा महाराष्ट्रच नव्हे तर हा भारत सदोदित स्मरणात ठेवेल. चळवळीचे सामर्थ्य बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर,अभिमान आणि अनाम समाजकार्याची गोडी अधिकच निर्माण होईल. जरी प्रत्यक्ष आपल्यात नसले तरी दाभोलकर यांची चळवळ उद्याचा प्रगत विज्ञानवादी समाज नक्कीच घडवेल तर, साळगावकरांनी दिलेला अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा मार्ग भारताच्या आगामी प्रवासासाठी अधिकच प्रशस्त होईल यात य:किंचित शंका वाटत नाही!
जय हिंद! सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे!
मुंबई शुभंकर करंडे *
२० ऑगस्ट २०१३ रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई
विशेष आभार :
महाराष्ट्र टाईम्स
लोकसत्ता
ibn लोकमत
abp माझा
Writer of this blog is a Founder & Head managing director of Magazine World of UGI*

![]() |
Jyotirbhaskar Jayant Salgaonkar Founder - Kalnirnay pariwar |

Dr. Narendra Dabholkar Editor, Sadhna & Founder,ANS |

No comments:
Post a Comment