कवितांचा ब्लॉग!!
kavita mi shodhat aahe!
Mayuresh Adhikari
सांजवेळी अवतीभवती पाखरांसंगे फिरत आहे ..
आजवरी कधी ना पाहीला विठ्ठल ,
तरी त्याचे ध्यान कैसे लागे ?
कधी ना पाहीले भक्तीसरोवर,
अमृताची गोडी कैसी लागे ||
म्हणे पांडुरंग देवांचा तो देव,
दर्शनाची तृष्णा कैसी भागे ?
तन मन झाले ठायी त्याचे लीन,
अभंगाचे स्नान चंद्रभागे ||
-तुषार दिवेकर आणि सतीश तांदळे
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
![]() |
Satish Tandle Ambewadi, Karveer, Kolhapur |
![]() |
Tushar Divekar Kolhapur |
Mayuresh Adhikari
सांजवेळी अवतीभवती पाखरांसंगे फिरत आहे ..
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे..
शब्द इतुके मोजून घेता,
स्फुरले मजला कसे बसे ,
मांडता हा फसला डाव ,
अन रचता रचता होत हसे!!
खाडाखोड होऊन इतुकी शाईसुद्धा संपत आहे...
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे..
सुचून सुचून खोल विचारात ,
डोक्यालाही येई खाज ..
सुचलेले हे लिहून पाहता ,
येते मजला माझी लाज..
विचारानाही विचारताना एकच गोंधळ उडत आहे..
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे..
एवढे लिहून अर्थाविण
अर्थही त्यास उरतो काय ?
जशी वाटते खिन्न नासकी ,
केविलवाणी दुधी साय ..
पान पान हे लिहून कागद कोरा मजला भासत आहे..
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे ..
भावना या जाऊन दडल्या ,
प्रत्येक शब्दा मागोमाग ..
जरा कुठे त्यास हिणविता ,
येतो त्यांना एकच राग..!!
हातात लेखणी थेट सरळ ही पानासंगे बोलत आहे..
पंखात माझा बळ येऊनही कविता मी शोधत आहे..
कविता ही तशीच आहे ,
ताज्या त्या दवबिंदुपरी..
पानांवरची पुसत अक्षरे ..
जुनाट का ती; असतील जरी..
कोणीच नव्हते कधीच केव्हा, पण कविता ती सोबत आहे..
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे..
**********
उजाडलेले आभाळ मी चांदण्यात पाहिले होते..
माझेच डोळे मी तुझ्यात पाहिले होते..
गारव्यात ही प्रीत झुळूक ती तशीच थरथरणारी
त्या मंद हवेत तुला माझ्या कवेत पाहिले होते..
मेघात अडकला चंद्र शुभ्र, पाण्यात स्वार तो मुक्त
त्या सफेद पांढऱ्या गोळ्यात मी तुलाच पाहिले होते..
कुजबूज कानी पडती, सांगण्यास ओठ हे झुकती ..
त्या कानाजवळ मी हात तुझेच पाहिले होते..
No comments:
Post a Comment