रंग माझा वेगळा
साभार - युनिटी फिल्म्स आणि आर्ट्स भारत
एकविसावे
शतक म्हणजे यंत्र आणि तंत्र युगाने झपाटलेले . साऱ्याच स्तरावरून बदललेले … याच युगामध्ये
वावरणारा आजचा माणूस … पण केवळ स्वतःतच रमलेला … ज्याला समाजाच्या कर्तव्याची काही
चाड नाही उरलेली … केवळ पैसा आणि संपत्ती यामध्ये गुरफटून गेलेला माणूस …
computerized झालेल्या संवेदनाहीन माणसांची
गर्दी… पण या हजारोंच्या गर्दी मध्ये स्वतःचा
वेगळेपण जपणारी काही माणसे असतात… माणूस म्हणून जगणारी जगणारी काही माणसे असतात. त्यापैकीच
एक म्हणजे प्रोफेसर बाळकृष्ण चौगले …
शिक्षण
आणि अध्यात्म या दोन्ही आघाड्यांवर आजतागायत न थकता लढत असलेलं एक असामन्य व्यक्तिमत्व
! आरस्पानी बावनकशी मनाचे सौंदर्य लाभलेला हा अवलिया …. अध्यापन आणि अध्यात्म या दोन्ही
आघाड्यांवर प्रवाचानासारख्या माध्यमातून समाज सुधारणेचा वसा जपत असणारा एक विचारवंत
समाज सुधारक…
३
जुलै १९५५ रोजी कोल्हापूर जवळील 'कसबा बावडा' येथे बाळासाहेबांचा जन्म झाला. येथीलच
शाळा नं. १ १ म्हणजेच आजच्या राजर्षी शाहू विद्यालयात त्यांच प्राथमिक शिक्षण पूर्ण
झाले . दंगेखोर असणारे बाळासाहेब मित्रांप्रमाणेच शिक्षकप्रिया होते . अभ्यासू वृत्तीच्या
बाळासाहेबांचा वर्गामध्ये नेहमी पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेला असायचा. त्यानंतर त्यांचे
माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल आणि नंतर स म लोहिया येथे झाले . पुढे महाविद्यालयीन
शिक्षण कोल्हापुरातील प्रसिद्ध कॉमर्स कॉलेज येथे झाले. बाळासाहेबांनी महाविद्यालयीन
जीवनामध्ये आपल्या अंगी असणाऱ्या विविध कौशल्यानी यश मिळवून कॉलेज च्या शिरपेचात मनाचे
तुरे रोव्ले. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नेहमीच अव्वल असणारे बाळासाहेब १ ९
७ ३ - ७ ४ मध्ये शहाजी कॉलेज च्या विदेशी खेळ
विभागाचे सेक्रेटरी झाले . पुढे आकर्षक व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुण या मु ळे ते महावीर
कॉलेज च्या जनरल सेक्रेटरी पदी विराजमान झाले .
![]() |
Mr. Balasaheb Chaugale & A poster of UFAAI documentary.. |
बाळासाहेबांनी
कॉलेज मध्ये असताना अभ्यास आणि क्रीदाक्षेत्राबारोबारच सांस्कृतिक क्षेत्रातही आपला
ठसा उमटवला . महाविद्यालयीन स्तरावर ४ वर्षे 'प्रेम तुझा रंग कसा', 'घेतलं शिंगावर',
'दिवा जळूडे सारी रात' या सारख्या तीन अंकी नाटकातून त्यांनी अभिनयाची चमक देखील दाखवून
दिली .
कब्बडी
, क्रिकेट , टेबल टेनिस यांसारख्या खेळामध्ये सहभाग घेऊन नंबर मिळवण्याबरोबरच सांस्कृतिक
क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करणारा हा असा
अष्टपैलू लाखात एकच !
मित्रांबरोबर
मटण च्या पार्टीवर तव मारणारा , टिपिकल कॉलेज
स्तुदांत म्हणून वावरणारा , आपल्या मतांवर ठाम असणारा हा मुलगा पुढील आयुष्यात
अध्यात्मिक जीवनात इतकी उंची गाठेल याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती.
२४ ऑगस्ट १९७९ रोजी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या
जोरावर ते कोल्हापूर येथील 'विवेकानंद कॉलेज' मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापनाचे
काम करत असताना लढाऊ बाण्याच्या बाळासाहेबांनी
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 'अभयकुमार साळुंखे' यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात इतर प्राध्यापकांसह लढा दिला. याची परिणीती म्हणजे
, 'अभयकुमार साळुंखे' हे या संस्थेचे कार्याध्यक्ष झाले.
अंगी
लढण्याचे कौशल्य असणारे बाळासाहेब पुढे 'सुता' या प्राध्यापक संघटनेचे सदस्य झाले.
प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या
या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या प्रमुख पदाची
सूत्रे दिली.
काही
वर्षे प्राध्यापक आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या बालासाहेबना या संघटनांमधील
अंतर्गत राजकारणाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या समवेत घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे
आश्चर्यचकित झालेल्या बाळासाहेबांनी मानसिक, वैचारिक घुसमट झाल्याने १९९२ पासून या
संघटनांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.
वाचनप्रिय
असणारे बाळासाहेब विविध प्रकारची पुस्तके वाचत असत. कथा, कादंबऱ्या,नाटक यांच्या वाचनाची
त्यांना भारी आवड होती. त्याच दरम्यान त्यांच्या हाती पडली, 'संत गाडगेबाबा'यांची चरित्रात्मक
कादंबरी 'डेबु'.. या कादंबरीने बाळासाहेबांच्या विचारधारेला धक्के दिले. हादरवून सोडल.
आणि बलासाहेबांचे विचार परिवर्तन झाले. त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
गाडगे महाराजांच्या चरित्रापासून मिळालेली प्रेरणेची उर्जा त्यांच्या नसानसात दौडू
लागली.आणि त्यांचा कथा, कादंबरी, नाटक - सिनेमा यांचा प्रेम संपुष्टात आले. अध्यात्मिक
साहित्याची ओढ निर्माण झाली. भगवतगीता, तुकारामगाथा , द्यानेश्वरी, नामदेव गाथा अशा
प्रकारच्या अध्यात्मिक साहित्याचे वाचन त्यांनी झपाटल्या सारखे सुरु केले. आणि त्यांचा
प्रवास सुरु झाला सामान्य कडून असमान्याकडे... अधात्माकडे ...
अधायात्मिक
क्षेत्रात रंगून गेलेल्या बाळासाहेबांनी अनेक संत , महात्म्यांच्या भेटी घेतल्या. विविध
तीर्थक्षेत्राना भेटी दिल्या. ग्रंथ वाचन सुरु करून अध्यात्मिक साधना सुरु केली. आणि
या अभ्यासानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यात सद्गुरूंची उणीव भासू लागली. पुढे अपेक्षेप्रमाणे
त्यांना गुरु देखील मिळाले.ते म्हणजे, डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा काका. पुढे यांच्या
सहवासात मार्गदर्शनाखाली सुरु झाला बाळासाहेबांचा अध्यात्मिक प्रवास...
डॉ.
काकांप्रमाणेच त्यांच्या अध्यात्मिक आयुष्याच्या विविध टप्प्यावरती विविध गुरूंचा मार्गदर्शन
त्यांना लाभत गेले. सततच्या अभ्यासाने अध्यात्मिक परिपक्वतेकडे त्यांची वाटचाल सुरु
झाली. त्यांनी प्रवचने देण्याचा निर्णय घेतला. आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा
या करिता १९९६ पासून त्यांनी प्रवचन सेवेस प्रारंभ केला. आणि अध्यात्मिक क्षेत्रात
स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी रसाळवाणीने ते भाविकांना
मंत्रमुग्ध करणारी प्रवचने देण्याचे काम २०१३ अखेरपर्यंत करत आले आहेत. आजवर त्यांचे
२००० पेक्षा जास्त प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत.
माणसाना
खर्या आत्म्याचा, मोक्षाचा आणि देवाचा शोध अध्यात्माचा अभ्यास केल्या शिवाय लागणार
नाही. धडधाकट युवा पिढीला संत साहित्याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे.त्याशिवाय माणुसकीची
ओळख होणे कठीण आहे असा त्यांचा ठाम मत आहे. दिशाहीन भरकटत चाललेल्या समाज, विचारसंस्कृतीला
प्रवचनाच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य महत्वाचे आहे असे ते मानतात.
आपले
अत्यंत महत्वाचे विचार त्यांनी आकाशवाणी केंद्र, बी चेनेल या सारख्या प्रसारमाध्यमातून
नियमित मांडून समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य अव्याहत केले आहे.या शिवाय कसबा बावड्याचे
हनुमान भक्त मंडळ, प्रज्ञापुरी येथील स्वामी समर्थ मंदिर, राधा कृष्ण मंदिर येथे ते
नियमित जाऊन प्रवचने देतात.
Watch a Documentary on the life of Balasaheb Chaugale here...
अध्यात्माच्या
क्षेत्रात कार्यरत असणार्या बाळासाहेबांचे अध्यापनाचे कार्य देखील तितक्याच जोमाने
सुरु आहे. 'विवेकानंद'मध्ये अकौंटन्सी विषय शिकवणाऱ्या बाळासाहेबांच्या लेक्चर वेळी वर्गातील सारी मुले हजर असतात. त्यांची
शिकवण्याची पद्धत इतकी वैशिस्थ्यापूर्ण कि लेक्चर संपल्याचे भान विद्यार्थी आणि बाळासाहेब
यांना राहत नाही. याचीच पोचपावती म्हणजे त्यांचे
अनेक विद्यार्थी बोर्डात चमकले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी
स्वतःचे सुंदर करियर घडवलंय. आणि मुख्य म्हणजे याचे संपूर्ण श्रेय विद्यार्थी
सरांना देण्यास विसरत नाहीत.
विद्यार्थ्यांबरोबर
बाळासाहेब स्टाफ चे देखील लाडके आहेत, त्यांच्या विषयी सारेच शिक्षक भरभरून बोलतात.
सर्वांचेच
भरभरून प्रेम लाभलेले बाळासाहेब कुटुंबियांच्या प्रेमापासुनही पारखे नाहीत. त्यांच्या
व्यक्तिमत्वाची छाप त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या संस्कारातून दिसून येते. अध्यात्मिक
आणि शैक्षणिक कामकाज सांभाळत त्यांनी संसार देखील तेवढ्याच जोमाने केलाय. याचीच फलप्राप्ती
म्हणजे त्यांची दोन्ही मुले 'अभिजित' आणि 'स्वप्नील' नेव्ही मध्ये कॅप्टन सारख्या मोठ्या
पदावर कार्यरत आहेत.
संपूर्ण
चौगले कुटुंबामध्ये त्यांच्या बद्दल प्रत्येकाच्याच मनात आदर आहे.
असं
हे सर्वांचं लाडके बहारदार व्यक्तिमत्व वयाच्या या टप्प्यामध्ये सुद्धा तरुण आहे. समोरच्या
माणसाला नेहमीच ते उर्जा देत असतात. रोज पहाटे लवकर उठून ध्यान करून , कॉलेज मध्ये
कर्तव्य बजावून पुस्तके वाचन करणे , प्रवचने देणे अशा शिस्तबद्ध आणि व्यस्त दिनक्रमात
ते कधीही थकत नाहीत. म्हणूनच ते स्वतःसह इतरानाही ताजे तवाने ठेवतात.
झपाटून
, झोकून कार्य करण्याची वृत्ती , शांत मोकळा स्वभाव , उत्साह , जोम अन काम करण्याची
उर्मी त्यांचे हे चिरतारुण्य टिकवून आहे.
''
रंगुनी रंगत साऱ्या.. रंग माझा वेगळा
गुंतुनी
गुंत्यात साऱ्या .. पाय माझा मोकळा''
जणू
असंच बाळासाहेबांच आयुष्य!
आंबेवाडी, कोल्हापूर - सतीश स.तांदळे
२९ सप्टेंबर २०१३ विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
©Unity
Films & Arts India 2013
All
rights are reserved!
Blog writer code - BL02
Blog code - B23
A UFAAI Documentary has ©Unity
Films & Arts India 2013!
Thank you!