रुईया महाविद्यालयाचा रोझ डे उत्साहात ...
कॉलेज विश्वामध्ये कपल्स म्हणजे अगदी नित्याचा विषय! याच कपल्स साठी खास करून फक्त माटुंग्याच्या 'रुईया'मध्ये साजराकेला जाणारा यंदाचा स्पेशल रोझ डे नुकताच (०७ सप्टेंबर) रोजी साजरा करण्यात आला. विविध रंगाचे गुलाब देणारी तरुणाई , प्रेमपत्रे,फ्रेन्डशिप कार्ड्स , हेट कार्ड्स यांनी सारे वातावरण अगदी फुलून आणि गुलाबी होऊन गेले होते! 'रुईया'च्या आजवरच्या शिस्तबद्धआणि सुसूत्रित आयोजनाची परंपरा यंदाही दिसून आली.
'पुनश्य शाळेमध्ये' ही थीम घेऊन यंदा 'रुईया'ने 'गुलाब दिवस साजरा केला.सुरक्षाव्यवस्था देखील प्रभावी होती.
शाळेतल्या गणवेशात आणि गोड - गुलाबी वातावरणात आलेले सारे तरुण प्रेमी आणि ताल धरायला लावणारा 'डी.जे' या मुळे कॉलेजचाquadrangle विलोभनीय दिसत होता. सामाजिक उपक्रमांना सातत्याने पाठींबा
देणारी आजची तरुणाई याही कार्यक्रमातून आपल्यासमोर आली. सामाजिक भान जपताना अमाप उत्साही
![]() |
Raghu Ram |
वातावरणात स्त्री - शिक्षणासाठी एका सामाजिक उपक्रमाचा याच वेळी प्रारंभझाला. तरुणाईत लोकप्रिय
असणारा 'रोडीज' फेम 'रघुराम'यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली. सेंट केथरीन या अंधेरीस्थित संस्थेकडून हा उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक 'मुंबईकर'ने एक रुपया दान करावा असे आवाहन
करण्यात आले असूनजमा होणाऱ्या रक्कमेचा मुलींच्या शिक्षणासाठी विनियोग करण्यात येणार आहे!
![]() |
Mansi Naik |
याच 'रोझ डे'ला यंदा प्रथमच fashion शो घेण्यात आला. अत्यंत चढओढ असणारी 'रोझ किंग' आणि रोझ
क्वीन या स्पर्धेचा हा शेवटचाराउंड होता.
सदिच्छा कुलकर्णी ही रोझ क्वीन आणि मोहनीश पित्रे हा रोझ किंग म्हणून विजयी झाला!यापूर्वी याचे आधीचे राउंड पार पडले होते,या करिता सुप्रसिद्ध मराठी
![]() |
Mohnish & Sadiccha |
![]() |
Neha Kakkar |
अभिनेत्री 'मानसी नाईक' आणि सुप्रसिद्ध bolly woodसिंगर 'नेहा कक्कर' यांनी परिक्षक म्हणून काम पहिले होते.मुख्य सोहळ्याकरिता 'गुमराह' फेम 'करण कुंद्रा' यांनी परिक्षक म्हणूनकाम पाहिले.याच वेळी त्यांच्या
![]() |
Karan Kundra' |
आगामी 'हॉरर स्टोरी' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.
bollywood सिंगर 'प्रिया पांचाल' यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. यावेळी 'प्रिया'नी गाणी गात तरुणाईला
आपल्या तालावर ठेकाधरायला लावला. 'डी. जे. धनुष' ने आपली शैली पेश करत सारा quadrangle डान्स
याचवेळी अजय नाईक दिग्दर्शित आगामी 'लग्न पाहावे करून' या चित्रपटाच्या टीमने देखील रंगत आणली. मुक्ता बर्वे,उमेशकामत,सिद्धार्थ चांदेकर, अमोल परचुरे आणि स्वतः दिग्दर्शक 'अजय नाईक' यांनी आपल्या उपस्थितीने आणि 'रुईया'च्या जयघोषानेवेगळीच मज्जा आणली. गाण्यांचा आस्वाद घेणारी तरुणाई , लग्न पाहावे करू म्हणणारे कलाकार , स्पर्धा आणि विविध स्पॉट गेम्सनी आणलेली रंगत तसेच 'लग्न पाहावे करून'चे म्युझिक लॉंच यामुळे सारा रोमांटिक माहोल तयार झाला होता.
Team Lagna Pahave Karun |
१९०९ या डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ऐतिहासक चित्रपटाचे देखील यावेळी प्रथमच promotion करण्यात आले. 'रुईया'च्यासांस्कृतिक आणि रसिकवृत्तीच्या साऱ्या परिवाराचा यंदाचा रोझ डे नक्कीच खास ठरला.
धन्यवाद!
मुंबई - मानस बर्वे
08 Sept. 2013 Ramnarain Ruia College
(शब्दांकन सहाय्य: शुभंकर करंडे)
Blog Code - B-12
Writer Code- bl04
Copyright @ MWUGI
Lai Bhari- SP
ReplyDelete