Thursday, 5 September 2013

शिक्षकदिन???

२०१३ चा 'शिक्षक दिन' म्हणजेच यंदा वेगळाच भासणारा एक वेगळाच सोहळा आहे! हा दिवस म्हणजे दरवर्षी शिक्षकांसाठी साजरा केला जाणारा भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मादिनाचा दिवस! नित्य -नियमाने न चुकता दरवर्षी या सर्व गोष्टींची उजळणी सर्वत्र होतेच पण, त्या शिवाय आजच्या युगात या पेशाची आठवण आणि महत्व अधोरेखित होत नाही याला कोण काय करणार??
Dr. Radhakrushnan
डॉ.राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म आंध्रप्रदेश या दक्षिण भारतातील राज्यात 'तिरुत्तनि' या गावी झाला.नामांकित शिक्षकतज्ञ असणारे हे व्यक्तिमत्व विविध स्तरावर आपली प्रतिमा निर्माण करून गेले.मग ते रशियाच्या स्टेलीनला कि जो सहसा कोणालाही भेटत नसे, त्याला सुमारे २ तास आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करणे असेल किंवा, 'एथिक्स ऑफ दि वेदांत'सारखे त्यांचे ग्रंथ असतील; जीवनातील वेगवेगळ्या आघाड्या या महान राजनीती तज्ञाने अभ्यासपूर्वक आणि कौशल्याने हाताळल्या!
आज सर्व वृत्तपत्रात हि आणि या पेक्षाही अनेक मोठी माहिती नक्कीच आली असेल.. पण, ज्या शिक्षक पेशासाठी हा दिवस खास करून साजरा केला जातो त्या पेशाचा दिवसेन दिवस चेहरा बदलत गेला. आजचा शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारा आणि प्रगतीच्या वाटेवर सर्व भारतीयांना सामावून घेणाऱ्या वृत्तीचा आहे! आजच्या युगामध्ये मूल्यांचे अवमूल्यन हे काही नवीन नाही.त्यामुळेच, शिक्षक हा पेशा याला अपवाद असणे म्हणजे काहीतरी नवलच!
आजकालच्या प्राथमिक ते उच्च -माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षक सोडून मला तरुणांचे शिक्षक कोण आणि कसे आहेत याचा थोडा खुलासा करावासा वाटतो! थोडक्यात , आजच्या महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत शिक्षकांविषयी मला आज बोलायचं आहे!
विद्यापीठे म्हणजेच 'विश्वविद्यालय' ही संकल्पना! याच युथ  फेस्टिवल्स च्या आयोजकांबद्दल जरासे बोलूया आणि मग पुढे जाऊया!
युवा महोत्सव म्हणजे तरुणाईचा सळसळता  अविष्कार.. जिंकण्यासाठीची चढओढ .. आपल्या महाविद्यालयाला परफोर्म करून जनरल चाम्पियानशिप घेणे!पण, या स्पर्धांमागे खरा उद्देश होता तो कलाकारांच्या आकांक्षांना व्यासपीठ मिळवून देण्याचा... पण, आज याही स्पर्धेला गालबोट लागले आहे असे म्हणावयास हरकत नाही! पर्सिलीटी हा आजचा रिवाज बनला आहे.. एखाद्या उत्तम कलाकृतीला त्याच्या दर्जानुसार गौरवणे काही परीक्षकांना अशक्य असते किंवा, तसे करवून घेण्याचे गैरकृत्य विद्यापीठाचे अधिकारी करत असतात!यातून एक ना अनेक महाविद्यालयांचे नुकसान तर होतेच शिवाय, त्याच्या अपयशाने सूडबुद्धी किंवा तिरस्कार या दोन्ही भावना वृद्धीस लागतात! मंगल , सरळ आणि नियमबद्ध सत्याची स्पर्धा करण्यापेक्षा राजकारण करून मांडलेले डाव काहीवेळा अनेक कॉलेजला तोंडघशी पाडतात. विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याबरोबरच नको ते संदेश अथवा समाज उध्रुक्त करणारी ही फेस्टिवल्स एकतर नकोशी वाटू लागतात किंवा,त्यांच्या प्रतीची निष्ठा किंवा आदर कमी होऊ लागतो. हा प्रकार आता सर्वत्र दिसून येण्यास सुरुवात झाली आहे! अनेक महाविद्यालयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे! विद्यार्थी, शिक्षक आणि त्या महाविद्यालयात एकूणच निराशा आहे! शिक्षक म्हणून घडवणाऱ्या हातांना साथ -सोबत देणारे त्यांचे अन्य बाहू जेव्हा निखळून पडतात तेव्हा चुकीचा संदेश, वामवृत्ती बळकट होण्याखेरीज काहीही निष्पन्न होत नाही!मला आशा वाटते की, यातूनच नवा बोध घेऊन विद्यापीठे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नक्कीच सुजाण आणि परिपक्व बनवतील.
काही महाविद्यालयांमध्ये काही शिक्षक खरेच खूप खास असतात!त्यांची देहबोली किंवा त्यांचे अध्यापन काहीही आणि कसेही करून खास असले की ते विद्यार्थीप्रिय होतातच! त्यातल्या त्यात काही जुन्या कॉलेज मध्ये त्या त्या  महाविद्यालीन वातावरणाचा प्रभाव एका परंपरेतून दिसून येत असतो! मराठी वाड्गमय मंडळ , थिएटर ग्रुप , विद्यार्थी प्रतिनिधी मंडळे असे अनेक संघ हा शिक्षक दिन साजरा करतात.. या निमित्ताने आपल्या लाडक्या शिक्षकांना सलाम करण्याचे भाग्य कॉलेज students ना लाभत असते!
देशभरातील अनेक शिक्षकांना याच दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरवण्यात येते. शिक्षकी पेशा असणाऱ्या प्रत्येक सजीवाला याचा नितांत अभिमान वाटत असतो! पण, काळवंडून निघालेल्या काही घटनांचे आणि बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थांचे भान प्रत्येक शिक्षकाला राखावेच लागते; कारण, उद्याचा सक्षम नागरिक ते घडवत असतात. त्याचे सुजनत्व त्यांच्या संस्कारात आणि त्यांच्या शिकवणीत दडलेले असते.
अशा या मंगलमयी 'शिक्षक दिनी' इथेच हे ब्लॉग रायटिंग संपवतो.. या शुभ?दिनाच्या शुभेच्छा देतो! जय हिंद!सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे!


05 Sept. 2013                            - Shubhankar Karande
Mumbai                                        Ramnarain Ruia College, Mumbai-19

Blog code- B11
Writer's Code-01
©Magazine World of UGI2013


(Writer of this blog is a founder & Head Managing Director of Magzine World of UGI) *

No comments:

Post a Comment