नाक्याचा गणपती : 'विद्यार्थ्यांचा राजा'...
![]() |
Ruia Naka Sarvajanik Ganeshotsav Mandal, Mumbai-19 |
प्रतिनिधी:११ सप्टेंबर
गणरायाचं आगमन झाले. दीड दिवसाचे गणपती आता पुन्हा गावी परतले.आजच्या या तंत्रप्रधान युगात गणपती बाप्पांची क्रेझ मात्र सर्वच वयोगटात कायम आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी सर्वत्र स्वागताच्या तयारीला वेग येतो. सकल कलांचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बाप्पांचे सर्वांच्या हृदयातील स्थान अनन्यसाधारण आहे. सांस्कृतिक, क्रीडा आणि मराठी परंपरेने समृद्ध असणाऱ्या मुंबई मधील काही जागा म्हणजे सर्वाना आपलेसे वाटणारे 'गणपती बाप्पा' मोठ्या आनंदाने विराजित होण्याची ठिकाणे!
माटुंग्याच्या 'रामनारायण रुईया कॉलेज'चा नाका म्हणजे यातीलच एक ठिकाण.गणरायाच्या आगमनापूर्वीच इथे जोमाने आणि मोठ्या जल्लोषाने स्वागत आणि उत्सवाची तयारी सुरु होते. 'रुईया'चा नाका म्हणजे सर्व आजी-माजी मित्र -मैत्रिणी यांना भेटण्याचे जीवनातील एक अविभाज्य ठिकाण;आणि याच ठिकाणी आपल्या लाडक्या 'बाप्पा'ची केली जाणारी प्रतिष्ठापना म्हणजे एक वेगळाच आनंद... हा गणपती बाप्पा म्हणजे, 'विद्यार्थ्यांचा राजा' म्हणून प्रसिद्ध आणि सर्वांच्या ओळखीचा आहे. अनेक कलाकारांचं ते श्रद्धास्थान आहे.
![]() |
रुईया नाक्याचा गणपती बाप्पा:'विद्यार्थ्यांचा राजा' (स्पेशल THANKS - गौरव चौधरी - VIA FACEBOOK) |
'रुईया'च्या समृद्ध नाक्यावर आणि जीवनातील एका अविभाज्य ठिकाणावर सारेच आजी माजी रुइएट न विसरता येत असतात. हा सारा परिसर रुइया, पोदार, वेलिंगकर या सर्व कोलेजची मुले तर, राजा शिवाजी विद्यासंकुल चे अनेक विद्यर्थि या गणपती बाप्पांचे दर्शन 'रुईया'च्या समृद्ध नाक्यावर आणि जीवनातील एका अविभाज्य ठिकाणावर सारेच आजी माजी रुइएट न विसरता आवर्जून येतात.
रुईया नाका गणेशोत्स्तव मंडळाचं हे ३६ वे वर्ष आहे.अनेक विद्यार्थ्यांचा लाडका हा बाप्पा नेहमीच त्याच्या लाडक्या भक्तांमुळे चर्चेत राहतो; म्हणजेच या मंडळाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते दरवर्षी नव्या नव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असतात. मागीलवर्षी स्त्री-शक्तीचा जागर करणारे हे मंडळ यंदा नैसर्गिक आपत्तींना आणि त्यामागील कारणांना भक्तांसमोर आणत आहे. सामाजिक जाणीव आणि तिचे भान राखणाऱ्या या 'विद्यार्थ्यांच्या राजा'चे दर्शन आपण नक्कीच घ्यायला हवे!
माटुंगा, मुंबई - प्रतिनिधी
११ सप्टेंबर २०१३ Magazine World of UGI
Important:-
We (Magazine World of UGI) are not responsible for this blog. All rights are reserved!)
©Magazine World of UGI 2013
No comments:
Post a Comment